अमित ठाकरेंच्या मागणीनंतर ठाकरे सरकारची वेगवान पावले, एमडी-एमएसच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मोदींना विनंती

डिसेंबर 2020 पर्यंत एमडी/एमएस परीक्षा पुढे ढकलण्यास भारतीय मेडिकल कौन्सिलला निर्देश द्यावेत, असे पत्र उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना लिहिले आहे.

अमित ठाकरेंच्या मागणीनंतर ठाकरे सरकारची वेगवान पावले, एमडी-एमएसच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मोदींना विनंती
Follow us
| Updated on: Jun 25, 2020 | 8:20 AM

मुंबई : मनसे नेते अमित ठाकरे यांनी ‘कोविड योद्धा’ असलेल्या निवासी डॉक्टरांच्या पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केल्यानंतर ठाकरे सरकारने वेगाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून डिसेंबर 2020 पर्यंत एमडी आणि एमएसच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. (Uddhav Thackeray Writes to PM after Amit Thackeray demands to postpone MD MS Exams)

डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने अमित ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर अमित ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा करुन हा मुद्दा मांडला होता.

“अंतिम वर्षाचे निवासी डॉक्टर कोरोना साथीच्या रोगाचा सामना करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्यामुळे डिसेंबर 2020 पर्यंत एमडी/एमएस परीक्षा पुढे ढकलण्यास भारतीय मेडिकल कौन्सिलला निर्देश द्यावेत” असे पत्र उद्धव ठाकरे यांनी लिहिले आहे.

“दरवर्षी मे/जून महिन्यात होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलल्या असून त्या 15 जुलैनंतर घेण्याचा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा प्रस्ताव आहे. मात्र हे निवासी डॉक्टर सध्या फ्रंटलाईन योद्धे म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांच्या नियोजित परीक्षा झाल्यास संकटकाळात प्रशिक्षित डॉक्टरांची मोठी कमतरता भासेल. त्यामुळे या परीक्षा डिसेंबर 2020 पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती करत आहे” असंही उद्धव ठाकरे यांनी लिहिलं आहे.

अमित ठाकरे यांचे पत्र काय?

“संपूर्ण देशात कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. या वैद्यकीय लढाईत सुमारे 2500 निवासी डॉक्टर्स दिवसरात्र रुग्णसेवा बजावत आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण (डिग्री आणि डिप्लोमा अंतिम वर्ष) घेणारे विद्यार्थी – निवासी डॉक्टर्स गेले अडीच-तीन महिने प्रचंड तणावाखाली आहेत. सुस्पष्ट धोरणाअभावी परीक्षेची टांगती तलवार त्यांना छळत आहे. ही परीक्षा आता 15 जुलैपासून घेण्यात येणार आहे. हा निर्णय घेताना 24 तास रुग्णांसाठी उपलब्ध राहणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या शारीरिक तसेच मानसिक क्षमतांचा विचारही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केलेला नाही” असं अमित ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

संबंधित बातमी : अमित ठाकरे राजभवनात, निवासी डॉक्टरांच्या परीक्षांबाबत राज्यपालांशी चर्चा

निवासी डॉक्टरांनी सुचवलेला पर्याय पत्रासोबत जोडत त्यांनी सुचवलेल्या पर्यायाची आपण गांभीर्याने दखल घ्यावी आणि योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे.

‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून द्यावा, अशी मागणी करणारे पत्र अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिले होते. ही मागणीही मान्य करत अजित पवारांनी मानधन दोन हजारांनी वाढवण्याचा शब्द दिला.

अमित ठाकरेंच्या मागण्या आणि मुख्यमंत्र्यांचा होकार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधी अमित ठाकरे यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या. बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुण्यात अडकलेल्या एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न अमित ठाकरे यांनी मांडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवघ्या बारा तासात आपला शब्द पाळत त्यांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठी व्यवस्था केली होती.

संबंधित बातम्या :

‘डॉक्टर हेच देव’, त्यांच्या मानधनात कपात होणार नाही याची काळजी घ्यावी, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमित ठाकरेंना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी बारा तासात पाळला   

(Uddhav Thackeray Writes to PM after Amit Thackeray demands to postpone MD MS Exams)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.