AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉकरोच जनता पार्टीने स्वीकारला पराभव? ज्ञानेश कुमार यांचा मुद्दा सोडून थेट जुन्या..

सीजेपीने मोठे आंदोलन पुकारले. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन सुरू केले. त्यातच आता सीजेपीची भूमिका बदलल्याचे बघायला मिळत आहे. सीजेपीचे बडे नेते वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.

कॉकरोच जनता पार्टीने स्वीकारला पराभव? ज्ञानेश कुमार यांचा मुद्दा सोडून थेट जुन्या..
Abhijeet Dipke cjp
| Updated on: Nov 19, 2026 | 4:59 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी आक्रमक भूमिका घेत होती. जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि दुसऱ्या मुद्द्यावर लढणार नाही, जोपर्यंत हा राजीनामा होत नाही. काही दिवसांपूर्वी वारंवार सीजेपीकडून यावर भाष्य केले जात होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा सीजेपीला हवा होता. पण आता सीजेपीने ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलन थांबवले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणारे सीजेपीचे सहसंयोजक साैरभ दास यांनी पराभव स्वीकारला का? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. जी मोहिम त्यांच्याकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी थांबवण्यात आली होती. ती मोहिम आता पुन्हा सुरू करण्यात आली. साैरभ दासने वारंवार आपल्या टीमला स्कूल ठीक करो अभियान सुरू करण्यास सांगितले.

दुसरीकडे अभिजीत दिपके यांनीही राज्यात सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर येथील जिल्हा परिषद शाळांची पाहणी करण्याची मोहिम सुरू करण्यावर भाष्य केले. सीजेपीने ही मोहिम 24 सप्टेंबरला थांबवली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत ही मोहिम स्थगित राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. त्यावेळी पत्रकार परिषदेते कॉकरोच जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी म्हटले होते की, ज्यावेळी आम्ही शाळांची पाहणी करण्यासाठी जात आहोत.

त्यावेळी लोक आम्हाला सतत मतचोरीबद्दल विचारत आहेत. त्यामुळे आम्ही स्कूल ठिक करो अभियानाला स्थगिती देत आमची पूर्ण ताकद ही ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामासाठी लावणार आहोत. 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत आंदोलन करण्यात आले. 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीत जमण्याचे आव्हान सीजेपीने केले. पण हे आंदोलन दिल्ली पोलिसांनी उघळून लावले.

तीन मुख्य नेत्यांना दिल्ली विमानतळावरच ताब्यात घेतले. त्यानंतर थेट बॉन्डवर सह्या या नेत्यांच्या घेतल्या. जंतरमंतरवर परवानगी नसतानाही गेल्या प्रकरणात साैरभ दास आणि आशुतोष रांका यांना जेलमध्ये जावे लागले. पीस बॉन्डवर त्यांच्या सह्या घेतल्या. ज्यामुळे रस्त्यावर उतरणे त्यांच्यासाठी आता अवघड झाले. आता सीजेपीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावर भाष्य करणे टाळल्याचे बघायला मिळतंय.

Follow Us
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर...
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर करायचा आहे, सिब्बल नेमके काय म्हणाले?
मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं
Eknath Shinde : मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं?
गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल
Shivsena Hearing : गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला
Saif Ali Khan Threat : पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला धमकीचा मेसेज
बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी....
Shaina NC : बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी
पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; दमदाटीचा व्हिडिओ..
Congress : पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रा...
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा
न्यायालयाचा आदेश तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा
kolhapur Balumama Devasthan : न्यायालयाचा आदेश आणि SIT ची मनाई तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा चर्चेत
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा BJP..
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा भाजपमध्ये प्रवेश
मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमान
Sanjay Nirupam : मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमानावरून संजय निरुपम आक्रमक