81 दिवसांनंतर शुक्र तूळ राशीत पुन्हा येणार; 22 नोव्हेंबरपासून 8 राशींच्या आयुष्यात होणार सकारात्मक बदल
Shukra Gochar: २२ नोव्हेंबर २०२६ रोजी शुक्र ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या या गोचरामुळे ८ राशींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. जाणून घ्या कोणत्या राशींना या काळात धनलाभ, प्रगती आणि सुख-समृद्धीचे संकेत मिळू शकतात.

ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीवर काही ना काही परिणाम होत असतो. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस शुक्र ग्रह तब्बल ८१ दिवसांनंतर पुन्हा एकदा आपल्या स्वराशीत म्हणजेच तूळ राशीत प्रवेश करणार आहे. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी होणारे हे गोचर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्राला प्रेम, विवाह, वैवाहिक सुख, धन, वाहन, दागिने, कला आणि भौतिक सुख-सुविधांचा कारक मानले जाते. कुंडलीत शुक्राची स्थिती अनुकूल असल्यास जीवनात सुख-समृद्धी आणि आनंद मिळतो, अशी मान्यता आहे. शुक्र १ जानेवारी २०२७ पर्यंत तूळ राशीत राहणार असून, या काळात काही राशींच्या आर्थिक स्थितीसह नातेसंबंध आणि करिअरमध्येही सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया, कोणत्या राशींना या गोचराचा लाभ मिळू शकतो.
मेष
कौटुंबिक जीवनात आनंद आणि सुख-सुविधा वाढतील. नात्यांमधील तणाव दूर होईल. व्यवसायात लाभ मिळेल. नोकरीतही चांगले परिणाम दिसतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. दररोज दुर्गा चालीसाचे पठण करणे लाभदायक मानले जाते.
वृषभ
विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. धार्मिक कार्यांमध्ये सहभाग वाढेल. अनावश्यक खर्च टाळा. भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि साखरेचा नैवेद्य दाखवा.
मिथुन
शिक्षण आणि नवीन कौशल्ये शिकण्याच्या बाबतीत चांगल्या संधी मिळतील. कौटुंबिक अडचणी दूर होईल. आर्थिक लाभाचे योग आहेत. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. शुक्राच्या शुभ प्रभावासाठी शुक्रवारी दुर्गा चालीसाचे पठण करा.
कर्क
जमीन, घर किंवा वाहन खरेदी करण्याच्या दृष्टीने हा काळ अनुकूल आहे. घरातील एखादी जुनी समस्या सोडवण्यात यश मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. अनावश्यक वस्तूंवर पैसे खर्च करणे टाळा. भगवान श्रीकृष्णाची आराधना करणे लाभदायक ठरेल.
कन्या
आर्थिक लाभ होऊ शकतो. समाजातील मान-सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळेल. मालमत्तेशी संबंधित निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवा. भगवान विष्णूची नियमित पूजा करणे शुभ मानले जाते.
तूळ
जीवनातील सुख-सुविधा वाढण्यासोबतच अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. नशिबाची साथ मिळण्यासाठी दररोज देवी लक्ष्मीची आरती करा.
धनु
उत्पन्नात वाढ होण्यासोबतच बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात. नवीन काम सुरू करण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल मानला जातो. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभ ठरेल.
मकर
नोकरी आणि व्यवसायात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाच्या नवीन संधी निर्माण होण्यासोबतच सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. लांबच्या प्रवासाचे नियोजन करताना काळजी घ्या. शुक्रवारी देवी दुर्गेची आराधना करणे लाभदायक मानले जाते.
कुंभ
सुख-सुविधांचा आनंद घेता येईल. आर्थिक उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल. व्यवसायाची स्थिती सुधारेल. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. रागावर नियंत्रण ठेवा. शुक्रवारी भगवान श्रीकृष्णाला लोणी आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)
