मोदींनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत चुकीची माहिती दिली : काँग्रेस

मोदींनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत चुकीची माहिती दिली : काँग्रेस

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत खोटी माहिती दिली, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते प्रवीण खेरा यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिल्यांदाच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. सगळीकडे प्रचार, सभा, आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रतिटीका यांची धामधूम असताना, काँग्रेस थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधला आहे.

LIVE UPDATE :

  • मोदींनी प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली, निवडणूक आयोगाने कारवाई करावी – काँग्रेस
  • 2000 सालानंतर गुजरातमध्ये आमदार, खासदार, सरकारी अधिकारी कुणालाच भूखंड दिला गेला नाही, असं भाजप खासदार मिनाक्षी लेखींनी कोर्टात सांगितलं, मग मोदींना कसा मिळाला? – काँग्रेस
  • मोदींनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत चुकीची माहिती दिली – काँग्रेस
  • काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
  • काँग्रेसची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतान पार पडलं आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 तारखेला होणार आहे. काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय स्तरावरील दोन्ही पक्षांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रतिटीका सुरु आहेत. काँग्रेस मोदींवर राफेल घोटाळ्याचा आरोप करत आहे, तर मोदी काँग्रेसवर गेल्या 70 वर्षात काहीच विकास केला नसल्याचा आरोप करत आहे. वेगवेगळ्या आरोपांनी निवडणुकीला रंगत आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *