काँग्रेसची तिसरी उमेदवार यादी जाहीर

नवी दिल्ली: काँग्रेसने आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर केली. तेलंगणातून आठ, आसाममधून पाच, मेघालयातून दोन, उत्तर प्रदेश सिक्किम आणि नागालँडमधून प्रत्येकी एक-एक उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलं. मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकूल संगमा यांना तूरा लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. त्याआधी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी 21 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. […]

काँग्रेसची तिसरी उमेदवार यादी जाहीर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

नवी दिल्ली: काँग्रेसने आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर केली. तेलंगणातून आठ, आसाममधून पाच, मेघालयातून दोन, उत्तर प्रदेश सिक्किम आणि नागालँडमधून प्रत्येकी एक-एक उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलं. मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकूल संगमा यांना तूरा लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे.

त्याआधी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी 21 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. नागपुरातून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच गडचिरोली, मुंबई उत्तर मध्य, दक्षिण मुंबई आणि सोलापूर या मतदारसंघांसाठीही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

लोकसभा निवडणूक : तुमच्यासाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

संबंधित बातम्या 

काँग्रेसची दुसरी यादी : राज्यातील दोन महालढतींचं सखोल विश्लेषण

वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर 

गडकरींविरुद्ध नाना पटोलेच लढणार, काँग्रेसकडून 21 उमेदवारांची यादी जाहीर   

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, पार्थ पवार, अमोल कोल्हेंना उमेदवारी

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.