Navi Mumbai Municipal Election : 30 जागा मिळाल्या नाही तर नवी मुंबईत आघाडी अशक्य – काँग्रेस

30 जागा मिळाल्या नाही तर नवी मुंबईत आघाडी शक्य नसल्याचं नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी स्पष्ट केलंय.

Navi Mumbai Municipal Election : 30 जागा मिळाल्या नाही तर नवी मुंबईत आघाडी अशक्य - काँग्रेस
नवी मुंबई महापालिका


नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकीचं वारं आता जोरात वाहू लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी असं चित्र दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 3 पक्षांच्या महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढवली तर ती भाजपसाठी आणि खास करुन गणेश नाईक यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. असं असलं तरी महाविकास आघाडीत जागावाटपावरुन सर्वकाही आलबेल असल्याचं चित्र सध्या तरी दिसत नाही.(Congress demands 30 seats for Navi Mumbai Municipal Corporation elections)

30 जागा मिळाल्या नाही तर नवी मुंबईत आघाडी शक्य नसल्याचं नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी स्पष्ट केलंय. नवी मुंबईमध्ये काँग्रेस कमजोर नाही. आघाडीच्या अनेक बैठका नवी मुंबईत झाल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आम्हाला जागा सोडतील अशी अपेक्षा आहे, असं कौशिक यांनी म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरुन अद्याप तरी एकमत झालं नसल्याचं स्पष्ट आहे.

नवी मुंबईत महाविकास आघाडीमध्ये धुसफूस

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकीकडे प्रत्येक पक्षाची धडपड सुरु आहे. तर दुसरीकडे जागा वाटपावरुन महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु झालीये. आगामी निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जास्त जागा देण्यास नकार दिला आहे. नवी मुंबईतील शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत तशी चर्चासुद्धा केल्याची सूत्रांची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आगामी महापालिका निडवणुकीत शिवसेनेला 70 पेक्षा अधिक जागा हव्या आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी शिवसेनेकडे जास्त जागा मागितल्या आहेत. मात्र नवी मुंबई आणि परिसरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राजकीय अस्तित्व कमी आहे. याच कारणामुळे शिवसेना या दोन्ही पक्षांचे मत विचारात घेत नसल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.

नेत्यांचा एकला चलो चा सूर

येथे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचे अस्तित्व तुलनेने कमी असल्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी ‘एकला चलो’ चा सूर आळवला आहे. त्यामुळे येथील नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तशी मागणीही केली आहे.

संबंधित बातम्या :

‘गणेश नाईक म्हणजे बुडतं जहाज, आमचे नगरसेवक त्यांच्याकडे जायचा मूर्खपणा करणार नाहीत’

काही लफडे झाले तर अर्ध्या रात्री फोन करा, मी येईल; आंतरराष्ट्रीय गुंडांनाही माझं नाव माहीत: गणेश नाईक

Congress demands 30 seats for Navi Mumbai Municipal Corporation elections

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI