कोट्यावधी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, पुस्तकावर बंदी घाला, काँग्रेसची पोलिसात तक्रार

याप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पोलिसांत भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दाखल केली (Congress complaint Book on Modi) आहे.

कोट्यावधी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, पुस्तकावर बंदी घाला, काँग्रेसची पोलिसात तक्रार

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत असून अनेक नेत्यांनी यावरुन भाजपवर टीका केली (Congress complaint Book on Modi) आहे. याप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पोलिसांत भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या पुस्तकाच्या लेखक, प्रकाशक तसेच विमोचकावर तातडीने कारवाई करावी. तसेच यावर बंदी घालावी अशी मागणी करत नागपूरमधील नंदनवन पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली (Congress complaint Book on Modi) आहे.

“दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे नेते जयभगवान गोयल यांनी काल दि. 11 जानेवारी 2020 रोजी दिल्ली भाजप कार्यालयात एक पुस्तक प्रकाशित केले आहे. त्याचे शिर्षक ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ असे आहे. यासंदर्भात स्वतः जयभगवान गोयल यांनीच ट्वीट करून माहिती दिली आहे.

भाजपने रायगडावर नाक घासून जनतेची माफी मागावी : धनंजय मुंडे

या पुस्तकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज हे कोट्यवधी शिवप्रेमींचे आराध्य दैवत असून, त्यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अन्य कोणाशीही करणे हा आमच्या भावनांचा अवमान आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जाती एकत्र करून सर्वसामान्य जनतेवरील अन्याय, दडपशाहीविरोधात संघर्ष पुकारला होता. आज मात्र या देशात सामाजिक विद्वेष निर्माण करून सर्वसामान्य जनतेवर अन्याय आणि दडपशाही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे हा त्यांच्या विचारधारेचा आणि कार्याचा मोठा अवमान आहे.

महाराजांचं कार्य अतुलनीय, पायाच्या नखाचीही बरोबरी नाही : अशोक चव्हाण

त्यामुळे या पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल, प्रकाशक तसेच विमोचक यांच्याविरूद्ध तातडीने कायदेशीर कारवाई करावी आणि या पुस्तकावर बंदी घालण्यासंदर्भात पावले उचलावीत, अशी माझी मागणी आहे,” असे अतुल लोंढे यांनी तक्रार दाखल करताना म्हटलं आहे

पुस्तकाचा नेमका वाद काय? 

भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे काल (12 जानेवारी) प्रकाशन करण्यात आले. भाजपच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात हा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकात मोदींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी हे नेते उपस्थित होते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाजपवर नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या : 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना ‘हे’ मान्य आहे का? संजय राऊतांचा उदयनराजे आणि संभाजीराजेंना सवाल

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’, भाजपकडून पुस्तक प्रदर्शित, सोशल मीडियावर संताप

Published On - 9:52 am, Mon, 13 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI