सत्तेसाठी विचारांशी तडजोड नाही, सावरकरांबाबतची भूमिका राऊतांना लखलाभ : विजय वडेट्टीवार

"सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध आहे. सत्तेसाठी आम्ही विचारांशी तडजोड करणार नाही. सावरकरांबाबतची भूमिका राऊतांना लखलाभ"

Vijay Vadettivar against Savarkar, सत्तेसाठी विचारांशी तडजोड नाही, सावरकरांबाबतची भूमिका राऊतांना लखलाभ : विजय वडेट्टीवार

नागपूर : “सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध आहे. सत्तेसाठी आम्ही विचारांशी तडजोड करणार नाही. सावरकरांबाबतची भूमिका राऊतांना लखलाभ”, अशी रोखठोक भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettivar against Savarkar) यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना पक्षाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली आहे. पण या मागणीला काँग्रेसने विरोध केलेला (Vijay Vadettivar against Savarkar) आहे.

“सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध आहे. सत्तेसाठी आम्ही विचारांशी तडजोड करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना समज द्यावी”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

“भविष्यात संजय राऊतांनी वक्तव्य करताना काळजी घ्यावी. संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत येत्या काळात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे”, असंही वडेट्टीवार म्हणाले.

“स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी काँग्रेसचा कायम विरोध राहिल. विचारधारेच्या बाबतीत काँग्रेसची फरफट होऊ देणार नाही. आम्हाला सत्ता नाही विचारधारा महत्त्वाची”, असंही वडेट्टीवार यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रात महाविकासआघाडीचा राजकीय प्रयोग करत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापन केली. मात्र, त्यानंतरही शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक भूमिका विरोधाभासी येत आहेत. सावरकरांच्या मुद्द्यावरही असाच संघर्ष पाहायला मिळत आहे. यापूर्वीही माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध केला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *