भाजपकडून राजकारणासाठी देवाचाही वापर, सचिन सावंत यांचा घणाघात

भाजपने राजकारणासाठी देवालाही सोडलं नाही. त्यांनी देवालासुद्धा राजकारणाच्या आखाड्यात ओढलं," अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर केली.

भाजपकडून राजकारणासाठी देवाचाही वापर, सचिन सावंत यांचा घणाघात


मुंबई : भाजपने राजकारणासाठी देवालाही सोडलं नाही. त्यांनी देवालासुद्धा राजकारणाच्या आखाड्यात ओढलं,” अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर केली. ते मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. (Congress leader Sachin Sawant alleged that BJP has used God for politics)

“भाजपने राजकारण करण्यासाठी देवालादेखील सोडले नाही. त्यांनी देवालाही राजकारणाच्या आखाड्यात ओढलं. भाजपच्या मनात देवाविषयी भक्तीभाव नाही. मात्र, राजकारणाच्या आखाड्यात देवाला ओढण्याचा प्रयत्न भाजप नेहमीच करत राहीला आहे,” असं सावंत म्हणाले. तसेच, कोरोना संकट अजून टळलेले नाही. त्यामुळे जनतेने आपली काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. राज्यातील सर्व मंदिरं सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. त्यानंतर पाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व मंदिरं सुरु करता येतील अशी घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं सुरु झाली आहेत. ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे काहींनी स्वागत केले. तर मुख्यमंत्र्यांना हे उशिराने सुचलेलं शहाणपण आहे, असं म्हणत विरोधकांनी सरकारवर टीका केली. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत भाजपविरोधात आक्रमक झाले आहेत.

प्रार्थनास्थळं सुरु करण्याची भाजपची मागणी

राज्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार हळूहळू सुरळीत करण्यात येत आहेत. मात्र, राज्यातील मंदिरं अद्याप बंदच होती. याच मुद्द्यावरुन मागील काही दिवसांपासून भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले होते. राज्यात बार आणि रेस्टॉरंट सुरू होतात, मग मंदिरं उघडण्याचा निर्णय का नाही, असा सवालही विरोधकांकडून उपस्थित केला जात होता.

राज्याला उशिराने सुचलेलं शहाणपण : प्रवीण दरेकर

राज्य सरकारचा मंदिरं सुरु करण्याचा निर्णय म्हणजे उशिराने सुचलेलं शहाणपण आहे, असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला चिमटा काढला होता. “उशिरा का होईना सरकारला शहाणपण सुचलं, या निर्णयामुळे सर्वांना दिलासा मिळेल. गरीब माणूस पांडुरंग किंवा परमेश्वराचरणी समाधान आणि शांती शोधत असतो. शिवाय जे व्यवसाय यावर अवलंबून असतात, त्यांचीही उपासमार होणार नाही, अशी आमची मागणी होती,” असं प्रवीण दरेकर म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

ही ‘श्रींची इच्छा! पाडव्यापासून मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडत आहोत; मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट!

(Congress leader Sachin Sawant alleged that BJP has used God for politics)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI