मध्य प्रदेश पोटनिवडणुकीत मोठा ‘घोडेबाजार’?, काँग्रेस आमदाराला ५० कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर गंभीर आरोप

भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर काँग्रेसने गंभीर आरोप केले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री उमंग सिंघार यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी ५० कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा आरोप केला आहे. त्यावर शिंदे यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केली आहे.

मध्य प्रदेश पोटनिवडणुकीत मोठा 'घोडेबाजार'?, काँग्रेस आमदाराला ५० कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 7:34 AM

भोपाळ: मध्य प्रदेश पोटनिवडणुकीत मोठ्या ‘घोडेबाजारा’चा आरोप भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर करण्यात आला आहे. कमलनाथ सरकारमध्ये मंत्री राहिलेले काँग्रेस नेते उमंग सिंघार यांनी शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. भाजपमध्ये येण्यासाठी शिंदे यांनी आपल्याला ५० कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचं सिंघार म्हणाले. काँग्रेस नेत्याच्या आरोपानंतर मध्य प्रदेशात आता राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी शिंदे यांच्याकडे आरोपांबाबत उत्तर मागितलं आहे. (Congress makes serious allegations against Jyotiraditya Shinde in Madhya Pradesh by-election)

बदनावरमधील प्रचारसभेदरम्यान दिग्विजय सिंग यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना आव्हान दिलं आहे. ‘उमंग सिंघार हे ज्योतिरादित्य यांचे खास होते. आता त्यांनी जे आरोप केले आहेत, त्यावर शिंदे यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं. उमंग सिंघार खरं बोलत आहेत की खोटं? हे शिंदे यांनी सांगायला हवं.’ असं आव्हान दिग्विजय यांनी केलं दिलं आहे.

दिग्विजय सिंग यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावरही निशाणा साधला आहे. ‘शिवराजसिंह यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून शिकायला हवं. एका मतासाठी त्यांचं सरकार पडलं होतं. ते सिद्धांतवादी होते.’ असा टोला दिग्विजय यांनी लगावला आहे.

उमंग सिंघार यांचा शिंदेंवर आरोप

‘काँग्रेसमध्ये तुम्हाला भविष्य नाही, तुम्ही भाजपमध्ये व्हा, तुम्हाला ५० कोटी रुपये आणि मंत्रिपद देतो, असं ज्योतिरादित्य शिंदे आपल्याला म्हणाले होते’, असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी मंत्री उमंग सिंघार यांनी केला आहे. त्यावेळी मी शिंदे यांना सांगितलं होतं, की माझ्यासाठी सिद्धांत महत्वपूर्ण आहेत, पद नाही, असं उत्तर आपण शिंदे यांना दिल्याचं सिंघार म्हणाले.

मार्च 2020 मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम-राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनीही काँग्रेस पक्ष सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं होतं. त्यामुळं कमलनाथ सरकारला पायउतार व्हावं लागलं आणि शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर रिक्त झालेल्या जागांसाठी मध्य प्रदेशात पोटनिवडणूक होत आहे.

संबंधित बातम्या:

निवडणूक आयोगाचा मध्यप्रदेशातील भाजप मंत्र्यांना दणका, एका मंत्र्यावर प्रचारबंदीची कारवाई तर दुसऱ्याला नोटीस

आचारसंहितेचं वारंवार उल्लंघन; ‘स्टार प्रचारक’पद काढलं; काँग्रेस नेते कमलनाथ यांना निवडणूक आयोगाचा झटका

‘अहंकारी नेत्याला धडा शिकवण्याची वेळ’, ज्योतिरादित्य शिंदे यांचा कमलनाथ यांच्यावर हल्लाबोल

(Congress makes serious allegations against Jyotiraditya Shinde in Madhya Pradesh by-election)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.