निवडणूक आयोगाचा मध्यप्रदेशातील भाजप मंत्र्यांना दणका, एका मंत्र्यावर प्रचारबंदीची कारवाई तर दुसऱ्याला नोटीस

मध्यप्रदेशातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपच्या दोन मंत्र्यांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. (Election Commission take action on two minsters of Madhya Pradesh BJP)

निवडणूक आयोगाचा मध्यप्रदेशातील भाजप मंत्र्यांना दणका, एका मंत्र्यावर प्रचारबंदीची कारवाई तर दुसऱ्याला नोटीस

भोपाळ : मध्यप्रदेशातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपच्या दोन मंत्र्यांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री मोहन यादव यांच्यावर एका दिवसाची प्रचारबंदी लावण्यात आली आहे. तर मदरशांमधील शिक्षणाबद्दल वादग्रस्त वक्तव्यामुळं मंत्री उषा ठाकूर यांना नोटीस पाठवत 48 तासात उत्तर द्यायला सांगितले आहे.  निवडणूक आयोगानं यापूर्वी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले होते.  (Election Commission take action on two minsters of Madhya Pradesh BJP)

मंत्री मोहन यादव यांनी भाजपला वाईट म्हणणांऱ्यांना जमीनीत गाडू, असं वक्तव्य केलं होते. तर, उषा ठाकूर यांनी 20 ऑक्टोबरला इंदौरमधील प्रचारसभेत देशातील सर्वांना सारखं शिक्षण मिळालं पाहिजे, धर्माआधारित शिक्षण कट्टरता आणि विद्वेष पसरवते, असं म्हटलं होते.

निवडणूक आयोगाने मोहन यादव यांना 31 ऑक्टोबर (शनिवारी) रोजी प्रचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. यादव यांना कोणत्याही प्रकारची जाहीर सभा, रॅली, रोड शो, मुलाखत, माध्यमांतील कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे.

कमलनाथ यांचे नाव स्टार प्रचाराकांच्या यादीतून वगळले

आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना मोठा झटका दिला आहे. निवडणूक आयोगाने कमलनाथ यांचं स्टार प्रचारकांच्या यादीतील नाव हटवलं आहे. त्यामुळे कमलनाथ मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीत प्रचार करू शकणार असले तरी त्यांच्या प्रचाराचा खर्च पक्षाला नव्हे तर उमेदवाराला द्यावा लागणार आहे.

दरम्यान, मध्यप्रदेशात 28 जागांवर विधानसभेसाठी पोटनिवडणुका होत आहेत. येत्या 3 नोव्हेंबर रोजी या जागांसाठी मतदान होणार असून 10 नोव्हेंबर रोजी या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.

संबंधित बातम्या :

आचारसंहितेचं वारंवार उल्लंघन; ‘स्टार प्रचारक’पद काढलं; काँग्रेस नेते कमलनाथ यांना निवडणूक आयोगाचा झटका

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीआधी राष्ट्रपती शासन लागू करा, भाजपची मागणी

(Election Commission take action on two minsters of Madhya Pradesh BJP)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *