कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास बाळासाहेब थोरातांचा नकार

अहमदनगरमधील संगमनेरचे आमदार असलेल्या बाळासाहेब थोरातांना कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास बाळासाहेब थोरातांचा नकार

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दर्शवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेऊन थोरात आपला निर्णय (Balasahabe Thorat Guardian Ministry) कळवणार आहेत. बाळासाहेब थोरातांना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे.

अहमदनगरमधील संगमनेरचे आमदार असलेल्या बाळासाहेब थोरातांना कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर कोल्हापुरातील कागल मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले आमदार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अहमदनगरचे पालकमंत्रिपद सुपूर्द करण्यात आले आहे.

मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद द्यावे आणि आपल्याऐवजी काँग्रेसमधील सहकाऱ्याला अहमदनगरचे पालकमंत्रिपद द्यावे, अशी विनंती थोरात करणार असल्याचं म्हटलं जातं.

काँग्रेसच्या बारा मंत्र्यांपैकी 11 मंत्र्यांना पालकमंत्रिपदं मिळाली आहेत, मात्र डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे एकाही जिल्ह्याचे पालकत्व नाही. त्यामुळे अहमदनगरचं पालकमंत्रिपद कदम यांना मिळण्याची चिन्हं आहेत.

विश्वजीत कदम हे माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र आहेत. विश्वजीत यंदा सांगलीतील पलुस कडेगाव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्याकडे सहकार, कृषी, सामाजिक न्याय अशा विभागांचं राज्यमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे.

‘या’ मंत्र्यांकडे एकही पालकमंत्रिपद नाही

जितेंद्र आव्हाड – कॅबिनेट मंत्री प्राजक्त तनपुरे – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे – राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर – राज्यमंत्री संजय बनसोडे – राज्यमंत्री संदीपान भुमरे – कॅबिनेट मंत्री विश्वजीत कदम – राज्यमंत्री

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यासह गडचिरोलीचेही पालकमंत्रिपद मिळालेले आहे.

राष्ट्रवादी (12)

1. पुणे- अजित अनंतराव पवार 2. रायगड – आदिती सुनिल तटकरे 3. नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ 4. अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ 5. सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील 6. सांगली- जयंत राजाराम पाटील 7. सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील 8. जालना- राजेश अंकुशराव टोपे 9. परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक 10. बीड- धनंजय पंडितराव मुंडे 11. बुलडाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे 12. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख

शिवसेना (13)

1. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे 2. ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे 3. रत्नागिरी-  अनिल दत्तात्रय परब 4. सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत 5. पालघर- दादाजी दगडू भुसे 6. धुळे- अब्दुल नबी सत्तार 7. जळगाव-  गुलाबराव रघुनाथ पाटील 8. औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई 9. वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई 10. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड 11. गडचिरोली-  एकनाथ संभाजी शिंदे 12. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख 13. अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

काँग्रेस (11)

1. मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख 2. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी 3. कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात 4. हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड 5. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण 6. लातूर- अमित विलासराव देशमुख 7. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे) 8. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत 9. वर्धा – सुनील छत्रपाल केदार 10. भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील 11. चंद्रपूर-  विजय नामदेवराव वडेट्टीवार

संबंधित बातम्या :

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर, आदित्य ठाकरेंकडे ‘या’ जिल्ह्याचे पालकमंत्रिपद

शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याकडे दोन जिल्ह्याचे पालकमंत्रिपद

ठाकरे सरकारचे पालकमंत्री जाहीर, कोणत्या पक्षाला किती पालकमंत्रिपदं?

महापालिकेवर शिवसेनेची सत्ता, तर मुंबईचे पालकमंत्रिपद काँग्रेसकडे

जितेंद्र आव्हाडांसह ‘या’ मंत्र्यांकडे पालकमंत्रिपद नाही

(Balasahabe Thorat Guardian Ministry)

Published On - 9:15 am, Thu, 9 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI