AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आम्ही स्थिर सरकार देऊ,” आघाडीची 3 तासांच्या बैठकीची माहिती 3 मिनिटांत

राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली मात्र अजूनही चर्चा सुरु आहे." असे पृथ्वीराज चव्हाण (Congress-NCP meeting on Maharashtra Government formation ) म्हणाले.

आम्ही स्थिर सरकार देऊ, आघाडीची 3 तासांच्या बैठकीची माहिती 3 मिनिटांत
| Updated on: Nov 20, 2019 | 9:45 PM
Share

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत (Congress-NCP meeting on Maharashtra Government formation ) वेगवान घडामोडी घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. जवळपास तीन तास ही बैठक झाली. या बैठकीनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. “महाराष्ट्रामध्ये गेल्या 21 दिवसांपासून जी अस्थिरता चालली आहे. ती संपवण्याकरिता आणि राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली मात्र अजूनही चर्चा सुरु आहे.” असे पृथ्वीराज चव्हाण (Congress-NCP meeting on Maharashtra Government formation) म्हणाले.

“महाराष्ट्रात गेल्या 21 दिवसांपासून अस्थिरता चालली आहे. ती संपवण्याकरिता आणि राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक झाली, ही चर्चा सकारात्मक झाली. अजूनही ही चर्चा सुरु असून आज आणि उद्याही ही चर्चा सुरु राहील,” अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

“महाराष्ट्रात स्थिर आणि लोकाभिमुख सरकार स्थापन होईल, आणि गेल्या काही दिवसातील अस्थिरता संपुष्टात येईल,” असे पृथ्वीराज चव्हाण (Congress-NCP meeting on Maharashtra Government formation) म्हणाले.

शिवसेनेसोबत चर्चा कधी करणार? असे पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, “सर्व घडामोडींवर चर्चा सुरु आहे, त्या निश्चित झाल्यानंतर आपल्याला माहिती दिली जाईल.”

“महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय पर्यायी सरकार स्थापन होऊ शकत नाही, आम्ही लवकरच स्थिर आणि पर्यायी सरकार देऊ, सरकारबाबत चर्चा सकारात्मक सुरु आहे,” असे नवाब मलिक म्हणाले.

“गेल्या काही दिवसांत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने प्रशासन ठप्प आहे, शेतकर्‍यांना मदत मिळू शकत नाही. त्यामुळे पर्यायी सरकार बनवण्यासाठी आम्ही सर्व बाजूने चर्चा केली. ही चर्चा अजूनही सुरु आहे.” असे नवाब मलिक म्हणाले.  “राज्यात तीन जण एकत्रित आल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही.” असेही ते (Congress-NCP meeting on Maharashtra Government formation) म्हणाले.

बैठकीनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मी काहीही ऐकलंल नाही, तुम्हीच मला माहिती देत आहात. मी माझ्या घरी बसलो आहे. मात्र त्या बैठकीत नक्की काय घडलं याची माहिती मला घ्यावी लागेल. ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवावी लागेल. असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

“आम्ही सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. उद्धव ठाकरे आणि आदित्याच्याही मी संपर्कात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तीन पक्षांचं सरकार येणार हे मी सांगतो आहे. पत्रकार परिषदेतही मी तेच सांगितलं. शरद पवारांनी मी सकाळीच भेटलो आणि  आताही भेटण्याची शक्यता आहे.”

“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची सूत्र हाती घ्यावी ही माझ्यासह सर्वांची इच्छा आहे. राज्याचं नेतृत्व त्यांच्या हाती यावं अशी जनतेची इच्छा आहे. मात्र हा निर्णय सर्वस्वी उद्धव ठाकरेंचा आहे,” अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली.

या बैठकीला राष्ट्रवादीकडून अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, सुनील तटकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, नवाब मलिक तर काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, जयराम रमेश, सी वेणुगोपाल, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान असे एकूण 15 जणांनी चर्चा केली.

शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाच्या दृष्टीने या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. किमान समान कार्यक्रम, त्याची अंमलबजावणी, सत्तास्थापनेतील अडथळे अशा सर्वांगीण बाजू या बैठकीत चर्चिल्या (Congress-NCP meeting on Maharashtra Government formation) गेल्या.

काँग्रेसचीही बैठक

दरम्यान, या बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्यांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक झाली.  राज्यातील सर्व बडे नेते या बैठकीला उपस्थित होते.  या बैठकीत शिवसेनेसोबत सत्तेत जाण्याबाबतची रणनीतीवर चर्चा झाली.

सोनिया गांधींचा हिरवा कंदील?

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हं दिसू लागली (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहेत. कारण काँग्रेस हायकमांडच्या दिल्लीतील बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत जाण्यास संमती दर्शवली आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...