खोटारड्या मोदींचा राफेल घोटाळ्यात थेट सहभाग: राहुल गांधी

खोटारड्या मोदींचा राफेल घोटाळ्यात थेट सहभाग: राहुल गांधी

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल लढाऊ विमान करारावरुन पुन्हा एकदा हल्ला चढवला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटारडे आहेत. राफेल विमान घोटाळ्यात मोदींचा थेट सहभाग आहे. मोदींनी अनिल अंबानींना 30 हजार कोटी दिले. राफेलप्रकरणात मोदींकडून सौदेबाजी झाली”, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला. रॉबर्ड वाड्रा यांची कितीही चौकशी करा. चौकशीला आम्ही घाबरत नाही, असंही राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या भाषणाला उत्तर देताना, काँग्रेससह विरोधकांवर तुफान हल्ला चढवला. त्यानंतर आज राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिलं.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: राफेल घोटाळ्यात सहभागी आहेत हे मी वर्षभरापासून सांगतोय. आज हिंदू या दैनिकात ही बातमी छापून आली आहे. पंतप्रधानांनी हवाईदलाचे 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात टाकले”. असं राहुल गांधी म्हणाले.

VIDEO: लढाऊ राफेल विमानाची वैशिष्ट्ये

हवाईदल आणि संरक्षण मंत्रालयातील अधिकारी म्हणतात पंतप्रधान मोदी हे स्वत:च फ्रान्सशी बातचीत करत आहेत. अनिल अंबानींनाच कंत्राट मिळावं असं मोदींनी सांगितल्याची माहिती फ्रान्सचे तत्कालिन पंतप्रधान ओलांद यांनी दिली होती, असं राहुल गांधींनी नमूद केलं.

वाचा: 16 नको, 15 मिनिटंच द्या, मोदी उघडे पडतील: राहुल गांधी

राहुल गांधी यांनी द हिंदूच्या बातमीचा दाखला देत मोदी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. “राफेल करारात पीएमओच्या हस्तक्षेपामुळे किमती ठरवण्यात अडथळे येऊ शकतात हे संरक्षण मंत्रालयाने मान्य केलं होतं. मात्र तरीही पंतप्रधानांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला. मोदींनी अंबानींसाठी तडजोड केली”, असा आरोप राहुल गांधींनी केली.

संबंधित बातम्या 

जेटली म्हणाले ‘Q’, राहुल म्हणाले ‘AA’, लोकसभेत टाळलेली नावं कोणती?

एचएएल कराराचे पुरावे सार्वजनिक करत संरक्षण मंत्र्यांचा राहुल गांधींवर पलटवार  

‘वेल डन’ निर्मलाजी, मोदी-शहा-जेटलींकडून शाब्बासकी

राहुल गांधी v/s निर्मला सीतारमन : तिसरा आरोप- राफेलमध्ये 30 हजार कोटींचा घोटाळा  

राहुल गांधी v/s निर्मला सीतारमन : दुसरा आरोप- मोदींमुळेच 126 राफेलची संख्या 36 वर  

राहुल गांधी v/s निर्मला सीतारमन : पहिला आरोप – राफेल घोटाळा मोदींनीच केला?

Published On - 12:25 pm, Fri, 8 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI