‘वेल डन’ निर्मलाजी, मोदी-शहा-जेटलींकडून शाब्बासकी

मुंबई : राफेल लढाऊ विमान करारावरुन आज संसदेत गदारोळ झाला. सत्ताधारी पक्ष भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेसने एकमेकांवर आरोपांचा पाऊस पाडला. एकीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांचा राफेल घोटाळ्यात अप्रत्यक्ष सहभाग आहे, असा आरोप केला. तर दुसरीकडे संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी कमिशन मिळालं नाही म्हणून काँग्रेसने राफेल करार केला नाही, असा पलटवार केला. राफेल …

nirmala sitaraman, ‘वेल डन’ निर्मलाजी, मोदी-शहा-जेटलींकडून शाब्बासकी

मुंबई : राफेल लढाऊ विमान करारावरुन आज संसदेत गदारोळ झाला. सत्ताधारी पक्ष भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेसने एकमेकांवर आरोपांचा पाऊस पाडला. एकीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांचा राफेल घोटाळ्यात अप्रत्यक्ष सहभाग आहे, असा आरोप केला. तर दुसरीकडे संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी कमिशन मिळालं नाही म्हणून काँग्रेसने राफेल करार केला नाही, असा पलटवार केला.

राफेल मुद्यावर आज लोकसभेत वादविवाद झाले. यावेळी विरोधकांच्या प्रश्नांवर सीतारमन यांनी उत्तरं दिली आणि राफेल प्रकरणी सरकारची बाजू मांडली. सीतारमन यांनी सांगितले की, राफेल लढाऊ विमानांच्या करारा कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही. याबाबत विरोधक वेळोवेळी खोटं बोलत आले आहेत.

राफेलमुळेचं नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात भाजप पुन्हा सत्तेत येईल, असेही सीतारमन यांनी सांगितले.

संसदेत विरोधी पक्षांच्या आरोपांवर संरक्षणमंत्री अगदी सहजपणे उत्तरं देताना दिसल्या. त्यांनी राहुल गांधीवर निशाणा साधत म्हटले की, संसदेत मी खोटं बोलत असल्याचं म्हटलं गेलं. संरक्षण मंत्री सीतारमन खोटं बोलत असल्याचं, या संसदेत म्हटलं गेलं. या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना चोर सुद्धा म्हटलं गेलं. आता संसदेत नावं घेतल्याने काहींना त्रास होतो आहे.

कुणीतरी कुठल्या खास घराण्यातील आहे म्हणून ते मोदींना चोर आणि मला खोटारडी म्हणू शकत नाही.

राहुल गांधीच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना संरक्षणमंत्री म्हणाल्या, ऑफसेट करारात कुठल्याही भारतीय खासगी किंवा सरकारी कंपनीचा उल्लेख नव्हता. ऑफसेटसाठी 2013 सालच्या यूपीए सरकारच्या धोरणांचेच पालन करण्यात आले आहे. यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही, असे त्यांनी सांगितले. तर राफेल विमानांच्या किमती उघड करणे कराराच्या प्रक्रियेचे आणि अटींचे उल्लंघन असते, मात्र हे काँग्रेसला कळणार नाही, असेही सीतारमन म्हणाल्या.

संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी ज्या पद्धतीने आज काँग्रेसला प्रतिउत्तर दिले, त्यावरुन भाजपमधून त्यांचं कौतूक करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्वीट करत सीतारमन यांचे कौतूक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहीले की, राफेल बाबतच्या खोटारड्या मोहिमेचा पर्दाफाश करणारं संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांचं संसदेतील भाषण…


भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ट्वीट केलं की, एक खोटं फक्त इथपर्यंतच चालू शकतं, यापुढे नाही. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी राफेल बाबतच्या खोटारड्या आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्या मोहिमेचा पर्दाफाश केला, तेही तथ्यांसह. देशासमोर सत्य आणल्याबाबत मी त्यांचे अभिनंदन करतो.

 

अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही सीतारमन यांचं कौतुक केलं. त्यांनी ट्वीट केलं की, या उत्कृष्ट कामगिरीसाठी वेल डन निर्मला सीतारमनजी. तुम्ही राफेल विरोधातील विरोधकांनी चालवलेल्या खोट्या मोहिमेला नष्ट केले. आम्हाला तुमच्या कामगिरीवर अभिमान आहे.

 


संबंधीत बातम्या :

संसदेत राहुल गांधी आणि निर्मला सीतारमन आमने-सामने

राफेल: राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 मुद्दे

पर्रिकरांच्या बेडरुममध्ये राफेलची फाईल? काँग्रेसकडून ऑडिओ क्लिप जारी

राफेल परीक्षेत मोदी पास, व्यवहारात कोणताही संशय नाही: सुप्रीम कोर्ट

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *