संसदेत राहुल गांधी आणि निर्मला सीतारमन आमने-सामने

नवी दिल्ली : राफेल प्रकरणी आज लोकसभेत गदारोळ पहायला मिळाला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेत राफेल करारावरुन परत एकदा भाजपला घेरलं. शुक्रवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राफेल घोटाळ्यात अप्रत्यक्ष सहभाग आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर ते सभागृहातून बाहेर आले आणि सरकारवर घोटाळा केल्याचा आरोप माध्यमांसमोर केला. या करारासंबंधीत संवेदनशील …

संसदेत राहुल गांधी आणि निर्मला सीतारमन आमने-सामने

नवी दिल्ली : राफेल प्रकरणी आज लोकसभेत गदारोळ पहायला मिळाला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेत राफेल करारावरुन परत एकदा भाजपला घेरलं. शुक्रवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राफेल घोटाळ्यात अप्रत्यक्ष सहभाग आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर ते सभागृहातून बाहेर आले आणि सरकारवर घोटाळा केल्याचा आरोप माध्यमांसमोर केला. या करारासंबंधीत संवेदनशील प्रश्नांवर उत्तरं देण्याऐवजी संरक्षणमंत्री नाटक करत असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. ज्या राफेल कराराबाबत आठ वर्षांपर्यंत संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी, वायू सेनेचे अधिकारी बोलणी करत होते, त्याला पंतप्रधानांनी बायपास सर्जरी करत एका झटक्यात बदलून टाकले, असा आरोपही राहुल गांधीनी केला.

राफेल कराराच्या बायपास सर्जरीवर वायू सेनेने आक्षेप घेतला होता का? हे संरक्षणमंत्री सांगितील का? असा सवाल राहुल गांधीनी विचारला. या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी संरक्षणमंत्री नाटक करत असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. तसेच पंतप्रधान लोकसभेत येत नाहीत आणि माजी संरक्षणमंत्री गोव्यात जाऊन बसले आहेत, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला.

‘संरक्षण मंत्री दोन तास बोलल्या पण त्यांनी अनिल अंबानींचं नावही घेतलं नाही. जेव्हा मी त्यांना विचारले की, राफेल कराराच्या बायपास सर्जरीवर वायू सेनेने आक्षेप घेतला होता का, या प्रश्नावर उत्तरं देण्याऐवजी संरक्षणमंत्री नाटक करत होत्या. संरक्षण मंत्र्यांनी स्वत: हे मान्य केलं की, 36 राफेल विमानं खरेदी करण्यासाठी नवा करार करण्यात आला. जेव्हा मी विचारलं की, संरक्षण मंत्रालयाने यावर आक्षेप घेतला का, तेव्हा त्यांनी याचे उत्तर दिले नाही’, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

तर दुसरीकडे, कमिशन मिळालं नाही म्हणून काँग्रेसने राफेल करार केला नाही, असा आरोप संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत राफेल मुद्यावर बोलताना काँग्रेसवर केला. राफेलच्या निर्मितीचे कंत्राट एचएएला का दिले नाही? अनिल अंबानीच्या कंपनीची निवड का करण्यात आली? 126 पैकी 36 विमानचं का? असे प्रश्न वारंवार काँग्रेसकडून उपस्थित केले जात आहेत. त्यावर निर्मला सीतारमन यांनी व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरचे कंत्राट तुम्ही एचएएलला का दिले नाही? असा प्रतिप्रश्न केला. त्यामुळे लोकसभेत पुन्हा एकदा राफेल मुद्द्यावरून गदारोळ पहायला मिळाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *