Vishwajeet Kadam | ...आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो : विश्वजीत कदम

सौम्य लक्षणे दिसू लागल्याने चाचणी करुन घेतली आणि कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला, अशी माहिती विश्वजीत कदम यांनी ट्विटरवरुन दिली.

Vishwajeet Kadam | ...आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो : विश्वजीत कदम

सांगली : काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र कोणतीही लक्षणं नसल्याने पुण्यातील घरातच ते होम क्वारंटाईन झाले आहेत. (Congress State Minister Vishwajeet Kadam COVID Positive)

“धावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु अखेर मला कोरोना संसर्ग झालाच! थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने काल चाचणी करुन घेतली. आज त्याचा अहवाल आला आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो” अशी माहिती विश्वजीत कदम यांनी ट्विटरवरुन दिली.

राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी विश्वजीत कदम यांना सदिच्छा दिल्या. “विश्वजीत कदमजी आपण कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा. माझ्या सदिच्छा आपल्या सोबत आहेत.” असे ट्वीट रोहित पवार यांनी केले.

(Congress State Minister Vishwajeet Kadam COVID Positive)

विश्वजीत कदम यांच्या परिचय

विश्वजीत कदम यांच्याकडे ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्रीपदाची धुरा आहे. सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ आणि मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्रीपद कदम सांभाळतात.

विश्वजीत कदम हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे ते सुपुत्र. सांगलीतील पलुस कडेगाव मतदारसंघातून विश्वजीत कदम पुन्हा एकदा आमदारपदी निवडून आले आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय विभुते यांचा पराभव केला होता.

विश्वजीत कदम यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक मताधिक्य मिळवण्याचा विक्रम केला. 1 लाख 62 हजार 521 इतकं मताधिक्य मिळवून कदम यांनी विजय मिळवला.

विशेष म्हणजे या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मतं कोणत्याही उमेदवाराला पडलेली नाहीत. ‘नोटा’ला मतदारांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं दिली. शिवसेनेचे उमेदवार संजय विभुते हे 8 हजार 976 मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

संबंधित बातम्या :

गाडीतून जाताना खेळण्याचं दुकान दिसलं, आमदारांमधील ‘बाप’ जागा झाला!

(Congress State Minister Vishwajeet Kadam COVID Positive)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *