AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vikhe-Patil : अस्तित्व दाखवून देण्यासाठी कॉंग्रेसची धडपड, 20 वर्ष पक्षात राहूनही राधाकृष्ण विखे-पाटलांची जहरी टीका, कारणही सांगितले!

कॉंग्रेस पक्षाकडून केवळ केंद्र सरकारवर टीका करुन आपले अस्तित्व असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुळात पक्षाचा जो अजेंडा होता त्याचा विसरच पक्षाला पडलेला आहे. शिवाय जनतेच्या प्रश्नाचे काही देणेघेणे राहिलेले नाही, त्यामुळे जनतेचाही विश्वास या पक्षाने गमावला असल्याचे विखे-पाटलांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

Vikhe-Patil : अस्तित्व दाखवून देण्यासाठी कॉंग्रेसची धडपड, 20 वर्ष पक्षात राहूनही राधाकृष्ण विखे-पाटलांची जहरी टीका, कारणही सांगितले!
राधाकृष्ण विखे पाटीलImage Credit source: tv9 marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Sep 06, 2022 | 6:39 PM
Share

अहमदनगर :  (Radhakrishna Vikhe-Patil) राधाकृष्ण विखे-पाटील कधी काळी कॉंग्रेसमधील एक प्रमुख नेते होते. त्यांची राजकीय कार्यकीर्दही याच पक्षापासून सुरु झाली होती. पण आता (Congress Party) कॉंग्रेस हा पक्ष आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठीच धडपड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 20 वर्ष कॉंग्रेसमध्ये राहून युती सरकारच्या काळात राधाकृष्ण विखे-पाटील हे शिवसेनेमध्येही दाखल झाले होते. त्यानंतर 2019 लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान त्यांनी (BJP Party) भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता कॉंग्रेस हा वास्तवापासून दूर जात असून या पक्षाची दैयनिय अवस्था झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राजकारणात कधी काही होईल हे सांगता येत नाही, याचा अनुभव राज्यातील जनता गेल्या अडीच महिन्यापासून घेत आहेच पण ज्या पक्षामध्ये जडणघडण झाली त्यावरही विखे-पाटलांनी जहरी टीका केली आहे.

अपमानित होऊनही महाविकास आघाडीमध्येच

कॉंग्रेस पक्षाकडून केवळ केंद्र सरकारवर टीका करुन आपले अस्तित्व असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुळात पक्षाचा जो अजेंडा होता त्याचा विसरच पक्षाला पडलेला आहे. शिवाय जनतेच्या प्रश्नाचे काही देणेघेणे राहिलेले नाही, त्यामुळे जनतेचाही विश्वास या पक्षाने गमावला असल्याचे विखे-पाटलांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. राज्यातले नेते महाविकास आघाडीत सरकारमध्ये गेले, ते आपल्या अस्तित्वासाठी. पक्षाला अपमानित वागणूक मिळाली तरी सुद्धा गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकून राहिलेले आहेत.

पालकमंत्र्यांचीही निवड लवरच होतील

राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. आता प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्रीही दिला जाईल. याबाबत वरीष्ठ निर्णय घेतील पण त्यामुळे कोणते काम रखडले असे नाही. राज्य सरकारने आपल्या कामाचा धडाका सुरु ठेवलेला आहे. त्यामुळे जनतेची कामे रोखली जात नाहीत. सरकारचा उद्देश आणि जनतेची कामेही अशा दोन्हीही गोष्टी होत असल्याचे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले आहे.

बेकायदेशीर वाळू उपशाला बंदी

सत्तांतरानंतर धोरणेही बदलत आहेत. मविआ सरकारच्या काळात नगर जिल्ह्यातून सर्वाधिक वाळू उपसा केला जात होता. त्या बदल्यात कोणताही मोबदला सरकारला मिळत नव्हता. आर्थिक स्वार्थासाठी हे केले जात असल्याचे म्हणत विखे-पाटलांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. आता कारवाई करण्याच्या मी सूचना दिल्या आहेत कोणत्याही परिस्थितीत नगर जिल्ह्यातून बेकायदेशीर वाळू उपसा होणार नाही असेही ते म्हणाले आहेत.

Follow Us
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती