मोठी बातमी! नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना विधान परिषदेसाठीही मतदान करता येणार नाहीच

विधान परिषदेतही त्यांना आता मतदान करता येणार नाही आहे. मतदान करण्याची मागणी करणारी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

मोठी बातमी! नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना विधान परिषदेसाठीही मतदान करता येणार नाहीच
नवाब मलिक आणि अनिल देशमुख
Image Credit source: tv9
अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Jun 17, 2022 | 3:07 PM

मुंबई : नवाब मलिक आणि अनिल देशमुख (Nawab Malik and Anil Deshmukh) यांना मोठा झटका बसला आहे. विधान परिषदेतही (Legislative Council) त्यांना आता मतदान करता येणार नाही आहे. मतदान करण्याची मागणी करणारी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची याचिका उच्च न्यायालयानं (High Court) फेटाळून लावली आहे. महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका मानला जातोय. 20 जून रोजी विधान परिषदेसाठी मतदार पार पाडणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठीही नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करण्याची परवानगी नाकारण्यात आलेली होती. त्यानंतर आता विधान परिषदेसाठीदेखील मतदानाची परवानगी देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीचं मतांचं गणित यामुळे आता कसं राहतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

काही दिवसांपुर्वीच राज्यातील राज्यसभेसाठीच्या 6 जागांसाठी मतदान पार पडले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरूंगात असल्याने त्यांनी मतदान करता आले नव्हते. तर काही आमदार फुटल्याने महाविकास आघाडी सरकारला आणि त्यांनी दिलेला आमदाराला फटका बसला होता. शिवसेनेचे उमेदवार संयज पवार यांचा पराभव तर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक हे विजयी झाले होते. त्यावेळी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी राज्यसभेच्या निवडणूकीत आम्हाला मतदान करता यावं यासाठी एकदिवसा जामिन मंजुर करावा यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. मात्र तो न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी त्यांनी उच्चन्यालयात धाव घेतली होती. तसेच होऊ घातलेल्या विधान परिषदेसाठी मतदार करता यावं यासाठी परवानगी मागितली होती.

हे सुद्धा वाचा

दरम्यान आज उच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी पार पडली. ज्यात न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका मानला जातोय. 20 जून रोजी विधान परिषदेसाठी मतदार पार पाडणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें