मोठी बातमी: कोल्हापुरात अजित पवार आणि श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट; मालोजीराजेही उपस्थित

मराठा आरक्षणावर खासदार संभाजीराजे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे आता या भेटीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

मोठी बातमी: कोल्हापुरात अजित पवार आणि श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट; मालोजीराजेही उपस्थित
श्रीमंत शाहू छत्रपती आणि अजित पवार
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 9:41 AM

कोल्हापूर: कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. न्यू पॅलेस येथे ही भेट होत आहे. या भेटीवेळी संभाजीराजे छत्रपती यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे हेदेखील उपस्थित आहेत. मराठा आरक्षणावर खासदार संभाजीराजे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे आता या भेटीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. (DCM Ajit Pawar meet Shahu Chhatrapati in Kolhapur)

अजित पवार आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांची ही भेट नियोजित नव्हती. आज सकाळी अजित पवार अचानकपणे शाहू छत्रपती यांच्या भेटीसाठी न्यू पॅलेस येथे दाखल झाले. गेल्या पाऊणतापासून ही बैठक सुरु आहे. या बैठकीला मराठा समाजाचे काही नेतेही उपस्थित असल्याचे समजते. 16 जूनला कोल्हापुरातून मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या भेटीनंतर अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याच्या कामाला लागतील. सध्या कोल्हापूर हा राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सोबत दोन्ही नेत्यांची बैठक होईल.कोल्हापुरात काल दिवसभरात 1586 नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर 30 जणांचा मृत्यू झाला होता.

मराठा आरक्षणासाठी नक्षलवाद्यांनी काढलं पत्रक, संभाजीराजे छत्रपती म्हणतात…

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारे पत्रक काढल्यानंतर आता मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठा समाजासाठी सहानुभूती दाखवल्याबद्दल मी तुमचा आदर करतो. पण तुम्ही शिवबांचे खरे वैचारिक वारसदार असाल तर मुख्य प्रवाहात सामील व्हा, असे आवाहन संभाजीराजे यांनी नक्षलवाद्यांना केले.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून पुन्हा एक पत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी मराठा समाजाने (Maratha Reservation) दलाल नेत्यांपासून सावध राहावे, असा इशारा दिला आहे. भाकपा माओवादी कमिटी सचिव सह्याद्रीने हे पत्रक काढले आहे. नक्षलवाद्यांच्या या पत्रकाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

संबंधित बातम्या:

मराठा आरक्षणासाठी नक्षलवाद्यांनी काढलं पत्रक, संभाजीराजे छत्रपती म्हणतात…

Maratah Reservation: ‘मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे’

ठाकरे-चव्हाणांनी दिल्लीवारी करून लोकांना वेड्यात काढलं; आरक्षणासाठी 27 जून रोजी मुंबईत बाईक रॅली: मेटे

(DCM Ajit Pawar meet Shahu Chhatrapati in Kolhapur)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.