…जेव्हा बाळासाहेबांनी मीनाताईंना तुरुंगातून लिहिलेलं पत्र अजित पवार वाचतात!

येरवडा कारागृहात असताना बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. या पत्राचं वाचन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. | Ajit pawar Read Letter Balasaheb Thackeray yerwada jail

  • अश्विनी सातव डोके, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 13:49 PM, 26 Jan 2021
...जेव्हा बाळासाहेबांनी मीनाताईंना तुरुंगातून लिहिलेलं पत्र अजित पवार वाचतात!
Ajit pawar And balasaheb thackeray And Meenatai thackeray

पुणे : राज्यातील ऐतिहासिक कारागृहातील ठिकाणांची आणि घटनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधून आजपासून (26 जानेवारी) ‘जेल पर्यटनाला’ सुरुवात होत आहे. राज्यातील सर्वांत मोठ्या येरवडा कारागृहातून (Yerwada jail) या पर्यटनाला सुरुवात होणार आहे. आज जेल पर्यटन शुभारंभ कार्यक्रमाला येरवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, तर ऑनलाईन माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि गृहमंत्री अनिल देशमुख कार्यक्रमात सहभागी झाले. (DCM Ajit Pawar read the letter written by Balasaheb Thackeray to Meenatai Thackeray)

येरवडा कारागृहात असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. या पत्राचं वाचन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जागवल्या.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “जेल पर्यटन ही कल्पनाच वेगळी आहे. जेल पर्यटनाची प्रत्येकला उत्सुकता आहे. जेलमध्ये काय दाखवणार, काय बघायला मिळणार, हे प्रत्येकालाच आकर्षण असतं. आता जेल पर्यटनाच्या निमित्ताने नागरिकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील”, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले…?

“जेल पर्यटन ही कल्पनाच वेगळी आहे. पण या उपक्रमाबद्दल कदाचित टीका होण्याची शक्यता आहे. जितक्या व्यक्ती तितकी वेगवेगळी मत असतात. येरवडा कारागृहाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना म्हणजे या कारागृहाचे बांधकाम आहे. या कारागृहाला 150 वर्ष पूर्ण झालीत.”

मुख्यमंत्री काय म्हणाले…?

जेल भरो नंतर आता आपण जेल पर्यटन सुरु करत आहोत, या गोष्टीचा मला आनंद आहे. शिवसेनाप्रमुखांना भेटायला मी देखील येरवड्यात यायचो, त्यावेळचं त्या जेलचं वातावरण मला अजून आठवतंय, असं सांगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी लिहिलेल्या ‘गजाआडचे दिवस’ या पुस्तकाचा उल्लेख यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. आता या जेल पर्यटनातून आपल्या स्वातंत्र्य सेनानींच्या त्यागाची प्रचिती आपल्या नव्या पिढीला या निमित्ताने येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

या अनोख्या प्रयोगाबद्दल गृहमंत्री, गृह विभाग, पोलिस बांधव, माता-भगिनींचे  मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हिंदूहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या येरवडा तुरुंगातील दिवसांबाबतच्या आठवणींना उजाळाही दिला. या दिवसांबाबत त्यांनी लिहिलेल्या गजाआडचे दिवस पुस्तकातील उताराही उद्धृत केला.

(DCM Ajit Pawar read the letter written by Balasaheb Thackeray to Meenatai Thackeray)

हे ही वाचा :

आता सामान्यांनाही ‘जेलवारी’ची संधी? मुख्यमंत्री ठाकरेंच्याच हस्ते उदघाटन