आप गेली, भाजप आली… नेमकं काय घडलं? 13 पॉइंटमध्ये समजून घ्या दिल्लीच्या सत्तेचं ‘राज’कारण!
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा 70 पैकी 48 जागांवर विजय झाला आहे, तर आम आदमी पक्षाने 22 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला पुन्हा एकदा अपयश आले आहे. आपचा हा दारूण पराभव अनेक कारणांमुळे झाला असून, त्यात काँग्रेसचा भूमिका, एमआयएमचा प्रभाव आणि आपच्या काही मोठ्या नेत्यांचा पराभव समाविष्ट आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. विधानसभेच्या 70 जागांपैकी 48 जागांवर भाजपचा विजय झाला आहे. तर 22 जागांवर आम आदमी पार्टीचा विजय झाला आहे. या निकालानंतर तब्बल 12 वर्षाची आपची सत्ता गेली आहे. तर 27 वर्षानंतर भाजपचं दिल्लीत कमबॅक झालं आहे. काँग्रेसला या निवडणुकीतही खातं उघडता आलं नाही. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि आपचा चेहरा असलेले अरविंद केजरीवालच पराभूत झाले. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला. तर मुख्यमंत्री आतिशी यांना विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला. यावरून आपची दिल्लीतील अवस्था काय झाली याची कल्पना येते. पण दिल्लीत आपचा इतका दारूण पराभव कसा झाला? यामागची कारणं काय आहेत? यावर टाकलेला हा प्रकाश. ...
