शीख दंगल : काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठेप

नवी दिल्ली : 1984 सालच्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी काँग्रेसचे नेते सज्जन कुमार यांना दिल्ली हायकोर्टाने दोषी ठरवलं आहे. 1947 साली भारत-पाकिस्तान फाळणीवेळी जसे हत्याकांड झाले, त्याचप्रमाणे 37 वर्षांनंतर दिल्लीत घडलं, असेही दिल्ली हायकोर्टाने सुनावणीत नोंदवलं आहे. सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2018 पर्यंत सज्जन कुमार यांना शरण यावं लागेल. सज्जन कुमार […]

शीख दंगल : काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठेप
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:50 PM

नवी दिल्ली : 1984 सालच्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी काँग्रेसचे नेते सज्जन कुमार यांना दिल्ली हायकोर्टाने दोषी ठरवलं आहे. 1947 साली भारत-पाकिस्तान फाळणीवेळी जसे हत्याकांड झाले, त्याचप्रमाणे 37 वर्षांनंतर दिल्लीत घडलं, असेही दिल्ली हायकोर्टाने सुनावणीत नोंदवलं आहे. सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2018 पर्यंत सज्जन कुमार यांना शरण यावं लागेल.

सज्जन कुमार यांना जन्मठेपेच्या शिक्षेसह पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

सज्जन कुमार यांनी राजकीय संरक्षणाचा फायदा घेतल्याचे मत दिल्ली हायकोर्टाने नमूद केले. तसेच, जगदीश कौर या साक्षीदाराच्या धाडसाबद्दलही दिल्ली हायकोर्टाने कौतुक केले.

दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाचं शिरोमणी अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी स्वागत केले असून, सज्जन कुमार आणि जगदीश टायटलर यांना फाशीची शिक्षा होत नाही, तोवर कोर्टातली लढाई सुरुच ठेवणार आहोत, शिवाय, गांधी कुटुंबीयांना सुद्धा कोर्टात खेचू, असेही मनजिंदर सिंह म्हणाले.

23 सप्टेंबर 1945 रोजी जन्मलेले सज्जन कुमार हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत त्यांना आता दोषी ठरवलं गेलं आहे. सज्जन कुमार यांच्यासह आणखी पाच जणांवर शीखविरोधी दंगलीत सहभागाचा आरोप सीबीआयने केला होता.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें