AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा-विदर्भ नाही, बाळासाहेबांचे नाव दिल्याने समृद्धी महामार्गाचे काम सुरु : फडणवीस

मराठवाड्याशी संबंधित दोन योजना दिल्या, पण या योजनेला ठाकरे सरकारने स्थगिती दिली आहे, याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं

ठाकरे सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा-विदर्भ नाही, बाळासाहेबांचे नाव दिल्याने समृद्धी महामार्गाचे काम सुरु : फडणवीस
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Nov 23, 2020 | 11:03 AM
Share

औरंगाबाद : “ठाकरे सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा-विदर्भ नाहीच. नवीन सरकारने औरंगाबादच्या निधीलाही स्थगिती दिली. समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव दिल्यामुळे ते काम सुरु आहे, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारला लगावला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार शिरीष बोराळकर (Shirish Boralkar) यांच्या प्रचारासाठी फडणवीस औरंगाबादमध्ये आले होते. (Devendra Fadanvis taunts Samruddhi Mahamarg work under progress as it was named after Balasaheb Thackeray)

“मागच्या वेळी गोपीनाथ मुंडे गेल्यामुळे भाजपचा पराभव झाला, मात्र शिरीष बोराळकर यांनी चांगली मतं घेतली होती. यावेळी मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही चंग बांधला आहे. मराठवाडा आणि विदर्भाचं चित्र बदलल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणार नाही” असं फडणवीस म्हणाले.

“केंद्राच्या निधीतून आम्ही विकास केला, मराठवाड्याशी संबंधित दोन योजना दिल्या, यात मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजनाही होती. पण या योजनेला सरकारने स्थगिती दिली आहे. ते काम ठप्प आहे. समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी बकेटमध्ये आणण्यासाठी योजना केली, निधीची तरतूद केली, पण तेही काम बंद पडलेलं आहे” असं फडणवीस म्हणाले.

“मराठवाड्यातील दुष्काळामुळे शेतकरी आणि इंडस्ट्रीवर परिणाम होतो. सह्याद्रीचे पाणी आणले तर दुष्काळ संपू शकतो. औरंगाबादसाठी 1680 कोटी आम्ही पाण्यासाठी दिले. शहरातील रस्त्यांसाठी खूप निधी दिला, आता रस्ते तयार झाले. नवीन सरकारने औरंगाबादच्या निधीलाही स्थगिती दिली. समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिल्यामुळे ते काम सुरु आहे” असा टोला फडणवीसांनी लगावला.

“या सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा नाहीच. मराठवाडा आणि विदर्भाला पैसे देण्याचं राज्यपालांचे बंधन या सरकारने संपवले आहे. त्यामुळे मराठवाड्यावर अन्याय होईल” अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या. “पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार पदवीधरांचे प्रश्न मांडण्याऐवजी मुंबईच्या एसआरएचे प्रश्न मांडताना दिसतात” असा घणाघातही फडणवीसांनी केला. (Devendra Fadanvis taunts Samruddhi Mahamarg work under progress as it was named after Balasaheb Thackeray)

संबंधित बातम्या :

‘महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ’, सोलापुरातल्या राड्यावरुन देवेंद्र फडणवीसांची टीका

राज्य सरकार घोषणा करतं आणि पलटतं, त्यांची भूमिका लोकविरोधी, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

(Devendra Fadanvis taunts Samruddhi Mahamarg work under progress as it was named after Balasaheb Thackeray)

Follow Us
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट