काँग्रेसच्या सत्ताकाळात मंत्रिपद, कोल्हापुरातील दिग्गज नेत्याच्या भेटीला फडणवीस

प्रकाश आवाडेंच्या मातोश्रींच्या निधनानंतर सांत्वन भेटीसाठी देवेंद्र फडणवीस त्यांच्या निवासस्थानी गेले होते

काँग्रेसच्या सत्ताकाळात मंत्रिपद, कोल्हापुरातील दिग्गज नेत्याच्या भेटीला फडणवीस


इचलकरंजी : आमदार प्रकाश आवाडे (Prakash Avade) हे निवडून आल्यापासून आमच्यासोबतच आहेत आणि यापुढेही ते आमच्यासोबतच राहतील, असं सूचक वक्तव्य विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. फडणवीसांनी इचलकरंजीत प्रकाश आवाडेंची भेट घेतली. अपक्ष आमदार असलेल्या आवाडेंचा अधिकृत पक्षप्रवेश किंवा पक्षातील पदाबाबत फडणवीसांनी स्पष्टपणे बोलणे टाळले. त्यामुळे येत्या काळात इचलकरंजी शहरात मोठ्या राजकीय घडामोडी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Devendra Fadnavis meets independent MLA Prakash Avade in Ichalkaranji)

आमदार प्रकाश आवाडे यांच्या मातोश्री इंदूमती आवाडे यांचे निधन झाल्यानंतर सांत्वन भेटीसाठी देवेंद्र फडणवीस हे इचलकरंजीत आवाडेंच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिकही उपस्थित होते. अतिशय घरगुती स्वरुपाची भेट घेऊन चहापानानंतर ते बाहेर पडले.

“मी शपथ घेतली तेव्हाच आवाडेंचे पत्र”

“प्रकाश आवाडे हे अपक्ष निवडून आले आहेत. त्यानंतर शपथविधीवेळी सर्वप्रथम त्यांनी पाठिंब्याचे पत्र दिले होते. त्यावेळेपासून ते आमच्यासोबतच आहेत” असे पत्रकारांशी बोलताना फडणवीसांनी स्पष्ट केले. पक्षप्रवेशाबाबत तांत्रिक अडचणी असल्याने त्याबद्दल फडणवीसांनी सविस्तर बोलणे टाळले.

कोण आहेत प्रकाश आवाडे?

प्रकाश आवाडे हे इचलकरंजी मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत. वडील आणि माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याकडून राजकीय वारसा मिळाला. काँग्रेसच्या सत्ताकाळात प्रकाश आवाडेंनी मंत्रिपद उपभोगलं आहे. 1985 मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी प्रकाश आवाडेंची पहिल्यांदा निवड झाली. प्रकाश आवाडे हे 1988 ते 1990 या काळात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सहकार आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री होते. नंतरच्या काळात कॅबिनेट वस्त्रोद्योग मंत्री म्हणून त्यांनी धुरा सांभाळली. 1995, 1999, 2004 मध्येही आमदारपदी निवड. (Devendra Fadnavis meets independent MLA Prakash Avade in Ichalkaranji)

फडणवीसांसोबत झालेल्या भेटीदरम्यान माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, जि. प. सदस्य राहुल आवाडे, माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, उत्तम आवाडे, स्वप्निल आवाडे यांच्यासह आवाडे परिवारातील सर्व सदस्य आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपच्या माजी आमदाराचीही भेट

दरम्यान, कोल्हापूरकडे रवाना होताना फडणवीसांनी भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी फडणवीसांची हाळवणकरांसोबत चहापान करुन चर्चा केली.

संबंधित बातम्या :

फडणवीसांचा निकटवर्तीय अपक्ष आमदार पवार-ठाकरेंना भेटणार

काँग्रेसच्या बडे नेते कल्लाप्पाण्णा आवाडेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ

(Devendra Fadnavis meets independent MLA Prakash Avade in Ichalkaranji)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI