Devendra Fadnavis : “मंत्रिपदासाठी जरा कळ सोसा”, देवेंद्र फडणवीसांच्या भाजप आमदारांना सूचना

"मंत्रिपदासाठी जरा कळ सोसा", देवेंद्र फडणवीसांच्या भाजप आमदारांना सूचना

Devendra Fadnavis : मंत्रिपदासाठी जरा कळ सोसा, देवेंद्र फडणवीसांच्या भाजप आमदारांना सूचना
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 8:46 AM

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात भाजपचं सरकार सत्तेत येईल असं बोललं जातंय. या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) असतील, अशी शक्यता आहे. पण या सरकारचं मंत्रिमंडळ वाटप कसं असेल. कुणाकडे कुठलं मंत्रिपद असेल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. आपल्या पदरी मंत्रिपद पडेल अश्या आशेवर अनेक आमदार आहेत. तश्या शिफारशीही फडणवीसांकडे येत आहेत. यावर कालच्या भाजपच्या बैठकीत फडणवीसांनी आमदारांना (BJP MLA) काही सूचना दिल्या आहेत. “मला माहिती आहे, आपलं सरकार पुन्हा सत्तेत येतंय. त्यासाठी तुम्ही सगळे आनंदी आहात. या सरकारचा भाग होण्याची तुमची इच्छा आहे. पण सध्या लगोलग सगळ्यांना मंत्रिपद देणं शक्य होणार नाही, त्यामुळे जरा कळ सोसा… काही लोकांना मंत्रिपदासाठी थोडं थांबवा लागेल”, असं कालच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

फडणवीसांच्या आमदारांना सूचना

काल झालेल्या भाजपच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. नव्या सरकारची स्थापना, मंत्रिमंडळ वाटप, एकनाथ शिंदेगटासोबत जाताना काय आव्हानं असतील, त्यांना कसं सामोरं जायचं, अश्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी फडणवीसांनी आमदारांना काही सूचना दिल्या. “मला माहिती आहे, आपलं सरकार पुन्हा सत्तेत येतंय. त्यासाठी तुम्ही सगळे आनंदी आहात. या सरकारचा भाग होण्याची तुमची इच्छा आहे. पण सध्या लगोलग सगळ्यांना मंत्रिपद देणं शक्य होणार नाही, त्यामुळे जरा कळ सोसा… काही लोकांना मंत्रिपदासाठी थोडं थांबवा लागेल”, असं कालच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

संभाव्य फडणवीस मंत्रिमंडळ

सध्या भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. तर त्यांचं संभाव्य मंत्रिमंडळ कसं असेल? कोणतं खातं कुणाकडे असेल?, पाहूयात…

हे सुद्धा वाचा

नगरविकास आणि गृह खातं फडणवीसांकडेच

नव्या सरकारमध्ये फडणवीसांकडे नगरविकास आणि गृहखातं राहणार असल्याचं सांगितलं जात आहे, शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन त्यांच्याकडे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातं दिलं जाण्याची शक्यता आहे. अर्थ खातं हे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेच दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दादा भुसेंकडे कृषी तर उदय सामंत यांच्याकडे शिक्षण खातचं ठेवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दीपक केसरकर यांनाही चांगलं खातं दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बच्चू कडू, शंभुराज, सत्तारांना बढती

नव्या सरकारमध्ये बच्चू कडू, शंभुराज देसाई आणि अब्दुल सत्तार या राज्यमंत्र्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी या नेत्यांनी शिंदे यांच्याकडे फुल लॉबिंग केल्याचं सांगितलं जात आहे.

सत्तेचा फॉर्म्युला काय असेल?

शिंदे यांच्याबरोबर भाजपचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानुसार भाजपकडे 29 मंत्री असतील. तर शिंदे गटाला 13 मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. त्यात 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रिपदांचा समावेश आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून कुणा कुणाला मंत्रिपदे मिळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पंकजा मुंडेंना स्थान मिळणार नाही?

दरम्यान, नव्या सरकारमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना संधी दिली जाणार नसल्यांच सांगितलं जात आहे. पंकजा मुंडे या कोणत्याही सभागृहाच्या सदस्या नाहीत. शिवाय त्या राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत. मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

अपक्षांना संधी

शिंदे सरकारमध्ये ठरावीक अपक्षांना संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळेल. इतर अपक्षांना महामंडळांवर खूश केलं जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे या नव्या मंत्रिमंडळाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपचे संभाव्य मंत्री

देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील सुधीर मुनंगटीवार प्रवीण दरेकर गिरीश महाजन आशिष शेलार गोपीचंद पडळकर चंद्रशेखर बावनकुळे राम शिंदे नितेश राणे

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.