“विरोधीपक्षात असतानाही फॉलोअप घेतला, पण…”, फडणवीसांनी टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला जाण्यामागचं कारण सांगतलं…

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

Updated on: Oct 31, 2022 | 5:15 PM

राज्याबाहेर जाणाऱ्या औद्योगिक प्रकल्पांसंदर्भात पत्रकार परिषद घेत फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडली....

विरोधीपक्षात असतानाही फॉलोअप घेतला, पण..., फडणवीसांनी टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला जाण्यामागचं कारण सांगतलं...

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या प्रकल्पांची संख्या वाढली आहे. राज्याबाहेर जाणाऱ्या औद्योगिक प्रकल्पांसंदर्भात पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडली. यावेळी त्यांनी टाटा एअरबस प्रकल्पाबाबत (Tata Airbus Project) सरकारची बाजू विस्ताराने मांडली. विरोधीपक्षात असतानाही फॉलोअप घेतला, पण तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने याकडे दुर्लक्ष केलं. उद्योगांना आवश्यक त्या गोष्टी पुरवल्या नाहीत. त्यामुळे हे उद्योग राज्याबाहेर गेले, असं फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक हब म्हणून विकसित केलं जाईल, अशी केंद्रीय मंत्र्यांनी केलीय. त्यानुसार राज्यात प्रकल्प यायला सुरुवात झालीय. लवकरच राज्यात टेक्ससाईल पार्कदेखील येणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत, असं भासवलं जातंय. पण या प्रकल्पांसंदर्भात महाविकास आघाडी सरकारने ठोस भूमिका घेतली नाही. म्हणून प्रकल्प राज्याबाहेर गेले, असं फडणवीस म्हणाले.

बच्चू कडू Vs रवी राणा वादावर भाष्य

बच्चू कडू माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. बच्चू कडू यांना मी स्वत: फोन केला. त्यांना म्हटलं की आपल्याला सरकार बनवायचंय. आमची अशी इच्छा आहे की आपण युतीत असावं. त्यामुळे आपण गुवाहाटीला गेलं पाहिजे. या माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले, असं फडणवीसांनी सांगितलं.

माझ्या फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले. त्यामुळे बच्चू कडू यांनी कुणाशी सौदा केला, खोके घेतले, असं म्हणणं चुकीचं आहे. बाकी इतरांबाबत मी बोलत नाही. पण याचा अर्थ बाकीच्या लोकांनी सौदा केला, असं म्हणणं नाही. पण ते लोक माझ्या फोनवर गेलेले नाहीत. माझ्या फोनवर गेलेले एकटे बच्चू कडू आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लावलेले आरोप चुकीचेच आहे, असं फडणवीस म्हणालेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI