देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, विश्वासदर्शक ठरावापूर्वी नामुष्की

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या घटनाक्रमाला प्रचंड नाट्यमय वळणं येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजीनामा देण्याची नामुष्की आली आहे (Devendra Fadnavis Resign as CM).

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, विश्वासदर्शक ठरावापूर्वी नामुष्की
Follow us
| Updated on: Nov 26, 2019 | 4:00 PM

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या घटनाक्रमाला प्रचंड नाट्यमय वळणं येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजीनामा देण्याची नामुष्की आली आहे (Devendra Fadnavis Resign as CM). याआधी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे फडणवीस यांना देखील राजीनामा द्यावा लागेल असा अंदाज वर्तवला जात होता. तो खरा ठरत फडणवीसांनी बहुमत चाचणीत पराभव टाळण्यासाठी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जनतेने विधानसभा निवडणुकीत युतीला संपूर्ण बहुमताचा जनादेश दिला. आम्ही सेनेसोबत निवडणूक लढलो. मात्र, हा जनादेश भाजपला होता. कारण एकूण लढलेल्या जागांपैकी विजयाचं प्रमाण शिवसेनेच्या तुलनेत भाजपचं अधिक आहे. जे लोकं मातोश्रीबाहेर पडत नव्हते ते इतरांच्या पायऱ्या झिजवत होते. आमच्याशी बोलत नव्हते. अशातच राज्यपालांनी आम्हाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं. मात्र, आम्ही आमच्याकडे संख्याबळ नसल्याचं सांगत सत्ता स्थापनेस नकार दिला. राज्यपालांनी शिवसेनेला बोलावलं. त्यानंतर त्यांचं कसं हसं करुन घेतलं ते महाराष्ट्रानं पाहिलं. राष्ट्रवादीला देखील बोलावण्यात आलं मात्र त्यांनी देखील नकार दिला. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र, हे तिन्ही पक्ष विरोधी विचारधारेचे असल्यानं हे सरकार टीकणार नव्हतं.”

अजित पवार यांनी आम्हाला सरकार स्थापनेस मदतीची तयारी दाखवली. त्यांनी पाठिंब्याचं पत्र दिलं. त्यामुळे आम्ही चर्चा करुन सरकार स्थापन केलं. मात्र, त्यांनी काही कारणांमुळे राजीनामा दिला. आता आमच्याकडे देखील बहुमत उरलेलं नाही. म्हणून मी देखील माझ्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत आहे.

शिवसेनेच्या लक्षात आल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेपासून सेनेनं बार्गेनिंग सुरु केलं, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद ठरलं नव्हतं, भाजपने कधीच मुख्यमंत्रिपद देऊ असं शिवसेनेला सांगितलं नव्हतं,  न ठरलेल्या बाबींचा बाऊ करुन शिवसेनेने आडमुठेपणा केला. मुख्यमंत्रिपद दिलं नाही तर आम्ही कोणासोबतही जाऊ अशी भाजपला धमकी दिली, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गोपनीयपणे सत्तास्थापनेचा दावा करत 23 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासोबत भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या बंडखोर नेते अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख कुशल युवा राजकारणी म्हणून केली जाते. नगरसेवक, सर्वात कमी वयात महापौर, आमदार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ते मुख्यमंत्रिपद असा यशस्वी टप्पा देवेंद्र फडणवीस यांनी पार केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी झाला. 31 ऑक्टोबर 2014 रोजी वयाच्या 44 व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले होते.

देवेंद्र फडणवीस यांचं शिक्षण नागपूरमधील सरस्वती शाळेत झालं. त्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याच्या पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी आणि कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करुन त्यांनी डी. एस. ई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट या डिप्लोमाचं शिक्षण पूर्ण केलं.

राजकीय टप्पे :

1989 : भाजप युवा मोर्चाचे नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष 1990 : पदाधिकारी, नागपूर शहर पश्चिम 1992 : नागपूर शहराचे अध्यक्ष 1994 : भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष 1999 : ते आतापर्यंत : विधानसभा सदस्य 1992 : ते 2001 सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोन वेळा नागपूरचे महापौर 2001 : भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष 2010 : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणी्स 2013 : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष 2014 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी 1990 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 1992 आणि 1997 मध्ये सलग दोनदा नागपूर पालिकेत ते निवडून आले. सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ओळख आहे. इतकंच नव्हे तर महापौरपदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून ‘मेयर इन काऊन्सिल’ चा मान मिळविणारे फडणवीस हे पहिले आहेत.

अंदाज समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगरविकास व गृहनिर्माणाविषयी स्थायी समिती, राखीव निधीविषयी संयुक्त निवड समिती, स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समिती यासह विविध समित्यांवर मुख्यमंत्र्यांनी काम केले आहे.

अजित पवारांचा राजीनामा 

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांनी आज सकाळी वर्षा बंगल्यावर जाऊन आपला राजीनामा सोपवल्याचं सांगण्यात येत आहे.

अजित पवारांनी पदभार स्वीकारलाच नाही

देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा पदभार काल स्वीकारला. त्यामुळे अजित पवारही कालच उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार होते. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाच नसल्याचं समोर आलं. मंत्रालयात गेलेले अजित पवार कार्यभार न स्वीकारताच चर्चगेटमधील घरी (Ajit Pawar Returns without taking charge) परतले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी मनधरणीचे केलेले प्रयत्न यशस्वी ठरण्याची चिन्हं दिसत होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.