AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उर्दूत कॅलेंडर, अजान स्पर्धा, बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही, बेळगावात फडणवीसांचा राऊतांवर निशाणा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावात आज प्रचारसभेत शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेनेवर निशाणा साधला (Devendra Fadnavis slams Sanjay Raut in Belgaum).

उर्दूत कॅलेंडर, अजान स्पर्धा, बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही, बेळगावात फडणवीसांचा राऊतांवर निशाणा
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत.
| Updated on: Apr 15, 2021 | 8:11 PM
Share

बेळगाव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावात आज प्रचारसभेत शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेनेवर निशाणा साधला. संजय राऊत यांनी बुधवारी (14 एप्रिल) बेळगावात प्रचारसभा घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज बेळगावात भव्य सभा घेतली. या सभेत त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. “संजय राऊत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपवर गोळी चालवून काँग्रेसला मदत करण्यासाठी या ठिकाणी आले. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उरलेली नाही”, असा घणाघात फडणवीस यांनी यावेळी केली (Devendra Fadnavis slams Sanjay Raut in Belgaum).

‘संजय राऊत टीपू सुलतान साजरी करणाऱ्यांना जिंकवण्यासाठी आले’

“आता महाराष्ट्रात शिवसेना उर्दूत कॅलेंडर छापतेय. त्या कॅलेंडरमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव छापत आहे. म्हणून या कर्नाटकात जी काँग्रेस टीपू सुलतान जयंती साजरी करते त्यांना निवडून देण्याकरता शिवसेना नेते इथे आले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काँग्रेसला जिंकवण्याचा प्रयत्न सुरु आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले (Devendra Fadnavis slams Sanjay Raut in Belgaum).

‘आपण सगळे दु:खात असताना निवडणूक’

“इथे पोटनिवडणुक आहे. आमच्या वैनी या निवडणुकीला उभ्या आहेत. आपण सगळे दु:खात आहोत. अशा परिस्थितीत ही निवडणूक आहे. मग संजय राऊत या ठिकाणी का आले? याचं उत्तर मला सापडलं. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधल्या आणि गुण नाही तर वाण लागला, अशी अवस्था झालीय. काँग्रेसच्या सोबत राहून शिवसेनेने अजाण स्पर्धा घेतली. आम्ही महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवगाण स्पर्धा घेऊ. आम्ही छत्रपती उदयनराजे यांच्यासोबत शिवगाण स्पर्धा घेतली”, असं फडणवीस यांनी सांगितलं.

‘महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक जुना माणूस प्रचारात नाही’

दरम्यान, प्रचारसभेनंतर फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली. यावेळी देखील त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. “महाराष्ट्र एकीकरण समिती कधीही लोकसभा निवडणूक लढवत नाही. पहिल्यांदा त्यांनी लोकसभेला उमेदवार उभा केला. मी माहिती घेतली एकही जुना माणूस महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचारात नाही. हे स्पष्ट दिसत आहे इथला मराठी माणूस भाजपला मत देतो. ही मते कमी करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीला उभे करण्याचे काम काही लोकांनी केले आहे. त्यांचा उमेदवार स्पॉन्सरड आहे हे दिसते आहे”, असं फडणवीस म्हणाले.

फडणवीसांचा संजय राऊतांवर घणाघात

“संजय राऊत यांचा सध्या अजेंडा काँग्रेसला जिंकवणे हा आहे. नाहीतर ही पोटनिवडणूक आहे. ज्या ठिकाणी एक सिनियर नेते वारले, त्यांची पत्नी निवडणुकीला उभी आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती कधी निवडून येऊ शकत नाही हे माहीत आहे. समितीने कधी लोकसभा निवडणूक लढवलेली नाही. राऊतांना हे सर्व माहीत असताना ते इथे आले. कारण अलीकडे शिवसेना आणि काँग्रेस हे जवळ आले आहेत. कारण मुंबईत काही शिवसैनिक टिपू सुलतान जयंती साजरी करतात आणि इथे काँग्रेस टिपू सुलतान जयंती साजरी करतात. त्यामुळे टिपू सुलतान जयंती साजरी करणाऱ्यांना जिंकवण्यासाठी संजय राऊत बेळगावात आले होते”, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा :

आधी संजय राऊतांना मैदानात उतरवलं, आता स्वत: सायकलवर प्रचार, धैर्यशील मानेंनी बेळगाव पिंजलं!

Belgaum Bypoll: ‘देवेंद्र फडणवीस बेळगावात प्रचाराला आले तर ते महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिद्ध होईल’

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.