AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंदिराजींना जे जमलं नाही, ते यांना काय जमणार?; फडणवीसांनी ठाकरे सरकारला ललकारले

पोलिसी बळावर भाजपला दाबू असं या सरकारला वाटत असेल तर हा त्यांचा गैरसमज आहे. आम्ही अशा खूप लाठ्याकाठ्या खाल्ल्यात. भाजपचा डीएनए संघर्षाचा आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला घाबरत नाही, असं सांगतानाच जे इंदिराजींना जमलं नाही ते यांना काय जमणार?, अशा शब्दात भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला ललकारले. (devendra fadnavis slams uddhav thackeray government over tolerance)

इंदिराजींना जे जमलं नाही, ते यांना काय जमणार?; फडणवीसांनी ठाकरे सरकारला ललकारले
| Updated on: Nov 18, 2020 | 8:51 PM
Share

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलीस बळाच्या जोरावर भाजप कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. पोलिसी बळावर भाजपला दाबू असं या सरकारला वाटत असेल तर हा त्यांचा गैरसमज आहे. आम्ही अशा खूप लाठ्याकाठ्या खाल्ल्यात. भाजपचा डीएनए संघर्षाचा आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला घाबरत नाही, असं सांगतानाच जे इंदिराजींना जमलं नाही ते यांना काय जमणार?, अशा शब्दात भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला ललकारले. (devendra fadnavis slams uddhav thackeray government over tolerance)

भाजपच्या मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला करतानाच मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंगही फुंकले. ठाकरे सरकारच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. पुढच्या काळात पोलीस तंत्राचा वापर करून भाजप कार्यकर्त्यांना अटक केली जाणार आहे. आम्ही त्याची चिंता करत नाही. आमचा डीएनए संघर्षातून तयार झालेला आहे. आम्ही खूप लाठ्याकाठ्या खाल्ल्या. तुरुंगात गेलो. आम्ही त्याची पर्वा करत नाही. लाठ्याकाठ्या खाणं हा आमचा रोजचाच धंदा आहे, असं सांगतानाच पोलिसी बळावर विरोधी पक्षाला दाबू असं सरकारला वाटतं असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. आम्हाला तुम्ही दाबू शकत नाही. कार्यकर्त्यांनों तयार राहा. ते तुम्हाला पुढच्या काळता त्रास देतील. तुम्ही घाबरू नका. जे इंदिराजींना जमलं नाही, ते यांना काय जमणार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

पोलिसांनो, नियमाने वागा

यावेळी त्यांनी पोलिसांनाही नियमाने वागण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी कायद्यानं वागावं ही त्यांना विनंती आहे. सरकारं येतात आणि जातात. हे लक्षात ठेवा आणि नियमाने वागा. कुणावरही विनाकारण कारवाई करू नका. जे नियमात असेल तेच करा. आम्ही चुकत असेल तर जरूर कारवाई करा. घाबरू नका. पण नियमांच्या बाहेर जाऊ नका, असा सल्लाही त्यांनी पोलिसांना दिला.

सरकार बदलताच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या बदलते का?

या सरकारच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. मी मुख्यमंत्री असताना माझ्याविरोधात आणि माझ्या पत्नीविरोधात ट्विट करण्यात आले. पण म्हणून आम्ही कुणाला जेलमध्ये टाकलं नाही, असं सांगतानाच पत्रकार अर्णव गोस्वामी यांना फसवण्याचा प्रयत्न झाला. पण सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला चपराक दिली. माझ्याविरोधातही गोस्वामी बोलले होते. शो ही केले होते. पण त्यांना मी तुरुंगात टाकलं नाही, असं ते म्हणाले. आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असताना त्यावर बोलणारे पत्रकार आणि संपादक कुठे आहेत? आता त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिसत नाही का? या सरकारलाही टॉलरन्स म्हणजे काय ते शिकवा ना? की सरकार बदलताच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्याही बदलते, असा सवाल करतानाच या देशातील तथाकथित उदारमतवादी लोक दुटप्पी आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. (devendra fadnavis slams uddhav thackeray government over tolerance)

संबंधित बातम्या:

इच्छा तिथे मार्ग, टाईमपास करायचा असेल तर कांजूरमार्ग; फडणवीसांचा घणाघात

“ऊर्जा मंत्री तुम्ही सावकार झालात, सावकारासारखी गरिबांकडून वसुली करत आहात”: देवेंद्र फडणवीस

देशातील लोकांना ‘कर्मयोग’ आवडतो, ‘बोलघेवडेपणा’ नाही; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

(devendra fadnavis slams uddhav thackeray government over tolerance)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...