मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीसांची 100 पत्र, उत्तर एकालाही नाही!

कोरोना आणि अन्य मुद्द्यांवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिसेंबर 2019 ते मार्च 2020 दरम्यान 100 पत्र लिहिली. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून फडणवीसांच्या एकाही पत्राला उत्तर दिलं नसल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीसांची 100 पत्र, उत्तर एकालाही नाही!
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 10:05 AM

मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 100 पत्र लिहिली आहेत. पण त्यापैकी एकाही पत्राला मुख्यमंत्र्यांकडून उत्तर देण्यात आलेलं नाही. फडणवीस यांनी विविध विषयांवर मुख्यमंत्री ठाकरे यांना सातत्यानं पत्र पाठवली. तशी माहिती खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच यापूर्वी दिलेली आहे. पण स्वत: मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून फडणवीसांच्या एकाही पत्राची दखल घेतली गेली नसल्याची माहिती मिळत आहे. (Devendra Fadnavis wrote 100 leatter to CM Uddhav Thackeray, but no reply from CM)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर 2019 ते मार्च 2020 याकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रांना उत्तरच मिळालं नसल्याची माहिती आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना अनेक पत्र लिहिली आहेत. तशी माहिती स्वत: फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्यापैकी एकाही पत्राचं उत्तर मला मिळालेलं नाही. पण त्या पत्रातील काही बाबींवर सरकारने विचार केला, त्यातच आपल्याला समाधान आहे अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती.

कोरोना चाचण्या वाढवण्यासंदर्भातही पत्रप्रपंच!

राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सप्टेंबरमध्येही एक पत्र लिहिलं होतं. त्यात राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर आधी कोरोना चाचण्या वाढवण्याचा सल्ला आणि मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. कोरोनाची चाचणी दिवसेंदिवस भीषण होत आहे. मुंबई जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ 14 टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत 42 टक्के इतकी आहे. त्यामुळं मुंबईत तातडीनं चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

संबंधित बातम्या :

मुंबईत दोन टक्क्यांनी रुग्ण वाढले, चाचण्यांची संख्या वाढवा; फडणवीसांचे बिहारमधून मुख्यमंत्र्यांना पत्रं

नुकसानीचे पंचनामे होत आहेत का?, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, मुख्यमंत्र्यांना पत्र

दारु दुकानं उघडली, जिम बंद, हे दुर्दैवी, जिम तत्काळ सुरु करा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Devendra Fadnavis wrote 100 leatter to CM Uddhav Thackeray, but no reply from CM

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.