हिवाळी अधिवेशनावेळी मुख्यमंत्र्यांची विधानभवनात अनुपस्थिती, देवेंद्र फडणवीसांनी कोणता सल्ला दिला?

आमचं सरकार असताना एखादा मंत्री आजारपणामुळे सभागृहात उपस्थित राहू शकला नाही तर आम्ही त्या खात्याची जबाबदारी दुसऱ्या मंत्र्याकडे दिली होती. मुख्यमंत्र्यांनी जबाबदाऱ्यांचं वाटप करावं, असा सल्ला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

हिवाळी अधिवेशनावेळी मुख्यमंत्र्यांची विधानभवनात अनुपस्थिती, देवेंद्र फडणवीसांनी कोणता सल्ला दिला?
देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे.
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 7:55 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर पाठीच्या मणक्यासंदर्भात शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे प्रत्यक्षपणे कुठल्याही कार्यक्रमात किंवा कामकाजात सहभागी होत नाहीत. आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनातही (Winter Session) मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधील नेत्यांकडून जोरदार टीका केली जातेय. अशावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मात्र उद्धव ठाकरे यांना महत्वाचा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरुन टीका करण्यात येत आहे. त्याबाबत पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला. तावर बोलताना ‘माननीय मुख्यमंत्र्यांची तब्येत खराब असेल आणि ते येत नाहीत म्हणून आक्षेप घेणं बरोबर नाही. तब्येत खराब असेल त्यामुळे ते आले नाहीत तरीही आम्ही अधिवेशन पार पाडू. आमचं म्हणणं एवढंच आहे की कामकाज व्हावं. आमचं सरकार असताना एखादा मंत्री आजारपणामुळे सभागृहात उपस्थित राहू शकला नाही तर आम्ही त्या खात्याची जबाबदारी दुसऱ्या मंत्र्याकडे दिली होती. मुख्यमंत्र्यांनी जबाबदाऱ्यांचं वाटप करावं’, असा सल्ला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आश्चर्य नाही – चंद्रकांत पाटील

उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते गैरहजर असणे स्वाभाविक आहे. आमच्या एवढाच आग्रह असा आहे की, परंपरेनुसार तुम्ही कुणाला तरी चार्ज द्यावा. त्याची प्रोसेस लंबी आहे. त्यासाठी चार्ज राज्यपालांकडे रजिस्टर करावा लागतो. तुम्ही राज्यपालांना कितीही मानायचं नाही ठरवलं तरी सुद्धा राज्यपालाशिवाय काहीही करता येत नाही. त्यांचा अन्य दोन सहकाऱ्यांसोबतचा अविश्वास स्वाभाविकच आहे. कारण त्यांनी तो चार्ज घेतला, तर सोडणारच नाहीत. त्यांच्या जर पार्टीतही कोणाकडे विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकतं. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या. आदित्य ठाकरेंनाही ते चार्ज देवू शकतात. आदित्य ठाकरेंकडे चार्ज दिला पाहिजे, असं चंद्रकांतदादा म्हणाले.

नितेश राणेंचाही मुख्यमंत्र्यांवर निशाणा

‘आपल्या राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेला नाही. राज्याचे अधिवेशन सुरू आहे, मात्र मुख्यमंत्री कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे राज्य नेमके कोण चालवतो असा प्रश्न पडतो. राज्याचा चार्ज सध्या कोणाकडे दिला आहे, याचीही काही माहिती नाही. रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री होणार आहे, अशी चर्चा आहे, निदान ते तरी जाहीर करा’, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलीय.

इतर बातम्या :

‘भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन केल्यामुळंच मी रडारवर’, माफीनंतर भास्कर जाधवांची भाजपवर टीका

शिवसेनेचा मोठा नेता भाजपच्या वाटेवर? फडणवीसांच्या भेटीसाठी अर्धा तास घुटमळ!

Non Stop LIVE Update
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.