एका वडापाववर दिवसभर मंत्रालयात फिरायचो, पण… : धनंजय मुंडे

राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे आमदार धनंजय मुंडे यांनी नुकतंच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य खात्याचा पदभार (Dhananjay munde take charge as a Social Justice) स्विकारला.

एका वडापाववर दिवसभर मंत्रालयात फिरायचो, पण... : धनंजय मुंडे

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे आमदार धनंजय मुंडे यांनी नुकतंच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य खात्याचा पदभार (Dhananjay munde take charge as a Social Justice) स्विकारला. “समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचा हा विभाग आहे. मी वंचितांना लाभ मिळवण्याचा नेहमी प्रयत्न करेन.” असे धनंजय मुंडेंनी पदभार स्विकारल्यानंतर (Dhananjay munde take charge as a Social Justice) सांगितले.

“या विभागाची जबाबदारी देण्यास थोडा उशीर झाला आहे. मात्र मी पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करेन,” असेही धनंजय मुंडे म्हणाले.

“मी एका वडापाव वर दिवसभर मंत्रालयात लोकांच्या कामासाठी फिरायचो. पण या मंत्रालयात मंत्री म्हणून येईल,” असं त्यावेळी वाटलं नव्हतं. त्यामुळे आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. असेही धनंजय मुंडे (Dhananjay munde take charge as a Social Justice) म्हणाले.

जवाहरलाल नेहरु विद्यालय (जेएनयू) परिसरात झालेल्या हिंसाचाराचा धनंजय मुंडेंनी तीव्र शब्दात निषेध दर्शवला. हा विद्यार्थी ही सत्ता उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही. केंद्र सरकारने आता आपली सीमा पार केली आहे. असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

“इंदूमिल संदर्भात आणखी निधी द्यावा लागणार असून पुढील दोन वर्षात म्हणजे 2022 पर्यंत हे स्मारक पूर्ण केलं जाईल.” असेही ते यावेळी  म्हणाले.

“परदेशात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 100 हून 200 करणार आहे. गेल्या सरकारच्या काळात मंत्र्यांचा पुराव्यासह डिग्रीचा विषय समोर आला होता. मात्र आता सुरुवातीलाच डिग्रीमुळे मंत्र्यांना बदनाम करणे हे वाईट आहे,” असेही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde take charge as a Social Justice) म्हणाले.

दरम्यान पदभार स्विकारण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळास भेट देत त्यांचा आशीर्वाद घेतला. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे जयंतीदिनी दर्शन घेत त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

त्याशिवाय दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास विनम्र अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेला समता, बंधुता आणि एकात्मतेचा पाया अधिक भक्कम करण्याची मी शपथ घेतली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI