गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार, धनंजय मुंडेंची ग्वाही; भावी अधिकाऱ्यांना दिला कानमंत्र!

गुणवान विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठ विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित यूपीएससी व एमपीएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले.

गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार, धनंजय मुंडेंची ग्वाही; भावी अधिकाऱ्यांना दिला कानमंत्र!
धनंजय मुंडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 5:29 PM

पुणे : राज्याचा सामाजिक न्याय विभाग अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. गुणवान विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठ विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित यूपीएससी व एमपीएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले. (Dhananjay Munde felicitates meritorious students of MPSC and UPSC examinations in Pune)

बार्टीच्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन यूपीएससी व एमपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवलेले विद्यार्थी निश्चितच कौतुकास्पद आहे. सर्व विद्यार्थ्यांचे विभागाच्या वतीने अभिनंदन करतो. त्यांनी मिळवलेले यश हे समाजातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. भविष्यात देशभरात अधिकारी म्हणून उच्च पदावर काम करताना देशाच्या हितासाठी आपण योगदान देऊ शकलो तर आपल्या कामाचे चीज झाले असे समजा, असा कानमंत्र धनंजय मुंडे यांनी यावेळी उपस्थित भावी अधिकाऱ्यांना दिला.

‘गुणवान विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती हेच लक्ष’

शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात असले तरी जागतिकीकरणाच्या युगात झालेल्या प्रचंड स्पर्धेत आपल्या देशाचे- राज्याचे विद्यार्थी कुठेही कमी नाहीत. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे कोणाची संधी हिरावून घेतली जाता कामा नये हे देखील महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच सर्व गुणवान विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती हेच विभागाचे लक्ष असल्याचे मुंडे यांनी यावेळी नमूद केले.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्यासह केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेले तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

वसतीगृह आणि संशोधन केंद्र निर्मितीचं आश्वासन

पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने पुण्यात पालकमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा असलेले मुला-मुलींचे वसतिगृह उभारणार. त्याचबरोबर जागतिक स्तरावरील संशोधन केंद्र निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुंडे यांनी दिली. नासा मध्ये शिक्षण घेत असलेल्या तेजस्विनी शिंदे या विद्यार्थिनीचे उदाहरण देत निश्चितच असे विद्यार्थी पुढे देशाचे व राज्याचे नाव उज्वल करतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

इतर बातम्या :

Video : राहुल गांधी गोवा विधानसभेच्या मैदानात, पणजी ते फोंडा दुचाकी टॅक्सीवरुन खास प्रवास!

राष्ट्रवादीनं ‘त्या’ 22 नगरसेवकांची यादी जाहीर करावी, भाजपचं आव्हान; कलानींचं स्पष्टीकरण काय?

Dhananjay Munde felicitates meritorious students of MPSC and UPSC examinations in Pune

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.