माझ्याच घरात विजय झाला, माझ्याच घरात पराभवही झाला याची खंत, धनंजय मुंडे भावूक

परळीत मिळालेला विजय ऐतिहासिक आहे. 30 हजारापेक्षा जास्तीच्या फरकाने विजय मिळवणं ही साधी गोष्ट नाही, असंही धनंजय मुंडे (Dhananjay Munde Victory) म्हणाले.

Dhananjay Munde Victory, माझ्याच घरात विजय झाला, माझ्याच घरात पराभवही झाला याची खंत, धनंजय मुंडे भावूक

बीड : राष्ट्रवादीचे परळीचे उमेदवार धनंजय मुंडे (Dhananjay Munde Victory) यांनी जनतेचे आभार मानले आहेत. शिवाय विजय मिळाला असला तरी पराभवही आपल्याच घरात झालाय, अशी खंत बोलून दाखवत धनंजय मुंडे भावूकही झाले. परळीत मिळालेला विजय ऐतिहासिक आहे. 30 हजारापेक्षा जास्तीच्या फरकाने विजय मिळवणं ही साधी गोष्ट नाही, असंही धनंजय मुंडे (Dhananjay Munde Victory) म्हणाले.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहिण-भावात परळीत काँटे की टक्कर होती. अखेर धनंजय मुंडेंची यात सरशी झाली. यावर धनंजय मुंडे म्हणाले, “अटीतटीची नव्हे तर एकतर्फी लढत होती. एक्झिट पोलमध्ये परळी भाजपला दाखवली होती, पण आम्ही 30 हजार पेक्षा जास्त फरकाने जिंकतोय, त्यामुळे यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे. मतदारसंघातील जनतेचे मनापासून आभार मानतो.”

पंकजा मुंडेंकडून पराभव मान्य

पंकजा मुंडे यांनी परळीत पराभव स्वीकारला आहे. जनतेने दिलेला कौल नम्रपणे स्वीकारत असून यापुढे जनतेसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी कायम काम करत राहिन, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. मतदारसंघात चांगलं वातावरण होतं, विजयाची खात्री होती, पण हा पराभव मलाच नव्हे, तर ज्यांचा विजय झालाय त्यांनाही अनाकलनीय आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी परळीत पंकजा मुंडेंवर मात केली.

परळीचा अंतिम निकाल

धनंजय मुंडे 30768 मतांनी विजयी

धनंजय मुंडे यांना मिळालेली मते – 121186

पंकजाताई मुंडे यांना मिळालेली मते – 90418

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *