आप्पा, तुम्ही अजूनही आमच्यात आहात, धनंजय मुंडेंनी जागवल्या आठवणी

गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन आप्पा अर्थात गोपीनाथ काकांना अभिवादन केलं आहे.

आप्पा, तुम्ही अजूनही आमच्यात आहात, धनंजय मुंडेंनी जागवल्या आठवणी

मुंबई : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती… विविध राजकीय पक्षाचे नेते त्यांना अभिवादन करत आहेत. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन आप्पा अर्थात गोपीनाथ काकांना अभिवादन केलं आहे. (Dhananjay Munde tribute Gopinath Munde on twitter For his Birth Anniversary)

“आप्पा…खरंतर जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत! तुम्ही अजूनही आमच्यात आहात ही भावना कायम मनात असते. त्याच प्रेरणेतून मी दीन-दुबळ्यांची, ऊसतोड मजुरांची सेवा करण्याचा, त्यांची उन्नती साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. स्व.अप्पांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन”, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पवार साहेब.. एक नाव नाही ती एक कारकीर्द आहे, एक मोहीम, एक वसा आहे, अशा शब्दात त्यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

“राजकारण व समाजकारणात काम करणाऱ्या माझ्यासारखा लाखो तरुणांसाठी एक दिशा आहे, आदरणीय पवारसाहेबांना 80व्या जन्मदिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा. आपणास दीर्घायुष्य लाभो हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना. #Yodhaat80”, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

गोपीनाथ गडावर गर्दी करु नका

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचं आणि कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे भोजनाच्या पंक्ती वैगेरे करता आल्या नाहीत. यंदा हा प्रसादच गोड मानून घ्या बाबांनो. हार, सत्कार, सेल्फी काही नाही, शुद्ध भावना आणि तुमची ऊर्जा हीच बस्स आहे, असं आवाहन करणारं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

(Dhananjay Munde tribute Gopinath Munde on twitter For his Birth Anniversary)

संबंधित बातम्या

‘हा प्रसादच गोड मानून घ्या बाबांनो, हार, सत्कार, सेल्फी काही नको’, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI