बीडच्या खासदारांना खरीप काय आणि रब्बी काय माहीत नाही: धनंजय मुंडे

बीड: बीडच्या विद्यमान खासदार डॉक्टर प्रितम मुंडे यांना पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर, राष्ट्रवादीमध्ये मोठी घालमेल सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराची धुरा राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हाती आहे. बहीण प्रितम मुंडे यांना टक्कर देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. धनंजय मुंडे यांनी आज प्रचाराचं वेगळं […]

बीडच्या खासदारांना खरीप काय आणि रब्बी काय माहीत नाही: धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

बीड: बीडच्या विद्यमान खासदार डॉक्टर प्रितम मुंडे यांना पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर, राष्ट्रवादीमध्ये मोठी घालमेल सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराची धुरा राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हाती आहे. बहीण प्रितम मुंडे यांना टक्कर देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

धनंजय मुंडे यांनी आज प्रचाराचं वेगळं तंत्र हाती घेतलं. पहाटे पाच वाजता घराबाहेर पडून मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांसोबत धनंजय मुंडे यांनी थेट संवाद साधला. इतकंच नाही तर त्याच ठिकाणी छोटेखानी सभाही घेतली. देशात प्रितम मुंडे या सर्वात जास्त मताधिक्क्याने निवडून आल्या होत्या. याचाच धसका आता धनंजय मुंडे यांनी घेतला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळेच आज धनंजय मुंडे भल्या पहाटे उठून उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ फिरत आहेत.

दरम्यान निव्वळ सहानुभूतीच्या जोरावर निवडून आलेल्या आमच्या बहिणाबाईचं कर्तृत्व काय, असा सवाल करत मला एकदा संधी द्या, अशी भावनिक साद धनंजय मुंडे यांनी नागरिकांना घातली.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, “भाजपचा उमेदवार सक्षम नाही. त्यांचा राजकाराणाशी संबंध नाही. स्वर्गीय मुंडेसाहेबांचं निधन झाल्यावर राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला नाही, त्यावेळी त्या निवडणुकीस उभ्या राहिल्या आणि निवडून आल्या. त्यांचा आणि राजकारणाचा काहीच संबंध नाही. मुंडे साहेबांचं निधन झाल्यावर रिकाम्या झालेल्या जागेवर त्या राजकारणात आल्या. त्यापूर्वी त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. त्यांना खरीप काय आणि रब्बी काय माहित नाही, शहरातील प्रश्न काय आणि खेड्यातील प्रश्न काय याची जाण नाही. म्हणून अनेक प्रश्न प्रलंबित. फक्त वडिलांचं नाव घ्यायचं आणि मत मागायचं, लोकांना भावनिक करायचं, आता या सर्व गोष्टीला लोक वैतागले आहेत. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली पाहिजे हे सामान्य जनतेची भावना आहे. “

राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी मोठ्या डामडौलात दाखल करण्यात येणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेसच्या मदतीवर शंका 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे सुरेश धस हे उमेदवार होते. मोदी लाटेत गोपीनाथ मुंडे यांचा निसटता विजय झाला होता. मात्र काही दिवसातच गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं आणि त्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादीने डॉक्टर प्रितम मुंडे यांच्याविरुद्ध उमेदवार दिला नव्हता. शिवसेनेनेही उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी काँग्रेसकडून अशोक पाटील यांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरविले होते. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मदतीने डॉक्टर प्रितम मुंडे यांना मोठं मताधिक्य मिळाले होते. आज घडीला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती आहे. मात्र मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने मदत न केल्याचा राग मनात धरून, काँग्रेस यावेळी खरंच राष्ट्रवादीला साथ देईल का याबाबत मोठी शंका आहे.

सोमवारी दाखल होणार उमेदवारी अर्ज 

भाजपच्या उमेदवार डॉक्टर प्रितम मुंडे, राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक विष्णू जाधव हे तिघेही सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजप, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी अशी त्रिशंकू लढत बीडमध्ये होत आहे. तिन्ही उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे, यात खरी बाजी कोण मारेल हे निकालादिवशी 23 मे रोजी समजणार आहे.

VIDEO:

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.