AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंडे प्रकरणात आघाडी सरकारची कोंडी, शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा, लवकरच भेट?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर ठाकरे सरकार चांगलंच अडचणीत सापडलं आहे.

मुंडे प्रकरणात आघाडी सरकारची कोंडी, शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा, लवकरच भेट?
| Updated on: Jan 13, 2021 | 9:23 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर ठाकरे सरकार चांगलंच अडचणीत सापडलं आहे. त्यातच विरोधी पक्ष भाजपने देखील आक्रमक पवित्रा घेत थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. तसेच स्वतः धनंजय मुंडे किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा न घेतल्यास भाजप राज्यभर आंदोलन करत रस्त्यावर उतरेल, असाही इशारा देण्यात आलाय. त्यामुळे आता ठाकरे सरकार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे (Discussion between Sharad Pawar and Uddhav Thackeray over rape allegation on Dhananjay Munde).

याच पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची फोनवर चर्चा झाली आहे. यात महाविकास आघाडी सरकारची धनंजय मुंडे यांच्या मुद्द्यावर काय भूमिका का असावी याविषयी चर्चा झाली. या बाबत लवकरच पवार आणि ठाकरे यांची भेटही होण्याची शक्यता आहे.”

अडचणीत सापडलेले धनंजय मुंडे शरद पवार यांच्या भेटीला

दरम्यान, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी एका गायक तरुणीने बलात्काराचे आरोप केल्यानंतर आज (13 जानेवारी) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांची सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली. यावेळी पवार- धनंजय मुंडे यांच्यात अनेक मिनिटं गुफ्तगू झालं. (Dhananjay Munde meet Sharad Pawar)

धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना भेटून त्यांची सविस्तर भूमिका पवारांसमोर मांडली. याअगोदर त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांची भूमिका महाराष्ट्रासमोर मांडली होती. त्यांच्या फेसबुक पोस्टनंतर किंबहुना खुलाशानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत होते. अखेर मुंडे यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा केली. तसंच त्यांची भूमिका स्पष्ट केली.

उद्धव ठाकरे, शरद पवारांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरू; चंद्रकांत पाटलांचा इशारा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपावर भाष्य करत राजीनाम्याची मागणी केलीय. धनंजय मुंडे स्वतःच आपली चूक झाली हे कबूल करुन राजीनामा देतील. त्यांनी राजीनामा दिला नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं (Chandrakant Patil demand resignation of Dhananjay Munde on rape allegations).

देश आणि महाराष्ट्राच्या, मोठ्या बातम्यांचं बुलेटीन, पाहा देश महाराष्ट्र , दररोज संध्या. 7 वा.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपींची चौकशी होईलच. पण मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. त्यांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला.

हेही वाचा :

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप; विजय वडेट्टीवार म्हणतात…

‘प्यार किया तो डरना क्या?’, मंत्री अब्दुल सत्तार धनंजय मुंडेंच्या मदतीला!

विरोधकांनी स्वत:ला आरशात पाहावे; मुंडेंच्या राजीनाम्यावरून अमोल कोल्हेंची टीका

Discussion between Sharad Pawar and Uddhav Thackeray over rape allegation on Dhananjay Munde

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.