उद्धव ठाकरे राज्यपालांच्या कोट्यातून आमदार होणार का? शिवसेना नेते दिवाकर रावते म्हणतात…

शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी मुख्यंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल कोट्यातून आमदार होणार की नाही यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Divakar Ravate on Assembly membership of Uddhav Thackeray).

उद्धव ठाकरे राज्यपालांच्या कोट्यातून आमदार होणार का? शिवसेना नेते दिवाकर रावते म्हणतात...

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार एकिकडे राज्यात कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, दुसरीकडे स्वतः उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत पेच निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही निवडणूक होणं शक्य नसल्याचं सांगत महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना राज्यपालांच्या कोट्यातून आमदार करण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र, भाजपने यावर आक्षेप घेत हे असंवैधानिक असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता राज्यपाल यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Divakar Ravate on Assembly membership of Uddhav Thackeray).

दिवाकर रावते म्हणाले, “कोरोना हे जागतिक संकट आहे. त्यासाठी देश आणि महाराष्ट्र खंबीरपणे लढतोय. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातखाली आपण कमालीचं काम करत आहोत. यातून त्यांनी आपलं सामर्थ्य दाखवून दिलं आहे. त्यांच्या कामाला चांगला पाठिंबा मिळत आहे. अशी जागतिक पातळीवर गंभीर परिस्थिती असताना विरोधी पक्ष मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो.”

“अशा परिस्थितीत घटनेच्या 171 कलमानुसार खंड 5 च्या नियमानुसार राज्यपालांच्या कोट्यातून आमदार होता येतं. राज्यपालांनी हे आमदरा निवडायचे हे बरोबर आहे. पण हे आमदार कोणते असावेत, तर ती व्यक्ती साहित्यिक, वैज्ञानिक, कला आणि समाजकार्य क्षेत्रातील असावी असं म्हटलेलं आहे. यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने उद्धव ठाकरेंचं नाव पाठवलेलं आहे. उद्धव ठाकरे राज्यपालांनी नियुक्त होण्याच्या निकषांमध्ये 100 टक्के बसतात. कलाकार म्हटलं तर त्यांची फोटोग्राफी ही जागतिक दर्जाची आहे. साहित्यिक म्हणायचं झालं तर ते सामनाचे संपादक आहेत. ठाकरे कुटुंबीय हे पत्रकारितेत असल्यामुळे ते त्यातही बसतात. सामाजिक कार्यकर्ते म्हटलं तर 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे ज्या पक्षाचं म्हणजेच शिवसेनेचं ध्येय आहे त्याचे ते प्रमुख आहेत”, असं दिवाकर रावते म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याबाबतचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला आहे. मात्र राज्यपालांनी त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. शिवाय भाजपनेही मंत्रिमंडळ निर्णयाला आक्षेप घेत, उद्धव ठाकरे हे राज्यपाल नियुक्त आमदार होऊ शकत नाहीत, असं म्हटलं आहे.

या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपालांकडे बोट दाखवत, राज्यपाल निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असल्याचं म्हटलं आहे. छगन भुजबळांनीही राज्यपालांना निर्णय घ्यावा लागेल, असं म्हणलं आहे.

“राज्यपाल अशा पद्धतीने कोणाची अडवणूक करु शकत नाहीत. उद्धव ठाकरे हे व्यंगचित्रकार , फोटोग्राफर, संपादक आहेत. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या सगळ्या नियमात उद्धव ठाकरे बसत आहेत. कोरोनाच्या संकटात सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये”, असं छगन भुजबळ म्हणाले होते.

चंद्रकांत पाटलांचा दावा

“उद्धवजींच्या विधानपरिषदेचा प्रस्ताव राज्यपालांकडे असून ते निर्णय घेतील. मात्र महाविकास आघाडीतील काहींना राज्यपालांनी हा प्रस्ताव मान्य करु नये, असं वाटतंय. उद्धवजींनी आमदार होऊ नये म्हणजे त्यांना राजीनामा द्यावा लागेल, असं काहींना वाटत आहे” असा दावा चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी पुण्यात केला होता.

‘राज्यपाल कोट्यातून आमदार होऊ शकत नाहीत’

“राज्यपाल कोट्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार होण्यास आमचा विरोध नाही (Chandrakant Patil on CM Uddhav Thackeray). त्याची घटनात्मक चर्चा व्हायची ती होईल. मात्र ते शक्यच नाही. घटनात्मकदृष्ट्या तसं होऊ शकत नाहीत”, असंही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काही दिवसापूर्वी म्हणाले होते.

संबंधित बातम्या  

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्याचीच चाल, चंद्रकांत पाटलांचा दावा 

राज्य कोरोनाशी लढतंय, भाजपला राजकारणाचं पडलंय, रोहित पवार संतापले 

मुख्यमंत्री राज्यपाल कोट्यातून आमदार होऊच शकत नाही, चंद्रकांत पाटलांचं घटनेकडे बोट

आपण आमदार नाही म्हणून मुख्यमंत्री बेचैन आहेत का? : चंद्रकांत पाटलांचा सवाल  

मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी फडणवीस, चंद्रकांत दादांनी पुढाकार घ्यावा : संजय काकडे

Divakar Ravate on Assembly membership of Uddhav Thackeray

Published On - 5:23 pm, Sun, 26 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI