खडसे-महाजनांचं मनोमिलन, मात्र दोन गटांचे समर्थक जिल्हा परिषदेतच भिडले

गेली 35 वर्ष कार्यरत असलेले भाजपचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र सूर्यभान पाटील यांना डावलून महाजन गटातील अमित देशमुख यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांचा संताप झाला

Khadse Mahajan Teams Rivalry, खडसे-महाजनांचं मनोमिलन, मात्र दोन गटांचे समर्थक जिल्हा परिषदेतच भिडले

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील मनोमिलन झालं असतानाच जळगाव
जिल्हा परिषदेत सभापतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. खडसे आणि महाजन यांच्या गटात जिल्हा परिषदेतच बाचाबाची (Khadse Mahajan Teams Rivalry) झाली.

अजिंठा गेस्ट हाऊसवर काल (रविवारी) गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांची सभापतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली होती. बैठकीत उमेदवारांची नावंही ठरली होती. रवींद्र सूर्यभान पाटील हे खडसे गटातील आहेत, तर अमित देशमुख हे महाजन गटातील आहेत.

गेली 35 वर्ष कार्यरत असलेले भाजपचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र सूर्यभान पाटील यांना डावलून महाजन गटातील अमित देशमुख यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांचा संताप झाला. त्यामुळे दोन गटात जिल्हापरिषदेमध्येच बाचाबाची झाली.

अखेर, रवींद्र पाटील आणि उज्ज्वला प्रशांत पाटील यांनी बंडखोरी करत सभापती आणि उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केले.

यावेळी भाजपचे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, नंदू महाजन, गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांनी दोघांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांनी बोलण्यास नकार दिला. विश्रामगृहावर चला, असं सर्व जण सांगत होते. मात्र कोणीही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हतं. आम्हाला डावललं गेलं आहे, इतकंच त्यांचं म्हणणं होतं.

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारत आपला गड शाबूत ठेवला. भाजपने 34-30 असा विजय मिळवत, महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला. जळगाव जिल्हा परिषदेत अध्यक्ष म्हणून रावेरच्या रजनी पाटील तर उपाध्यक्षपदी लालाचंद पाटील विजयी झाले. यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत भाजपचे वर्चस्व सिद्ध झालं आहे.

या विजयानंतर भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांनी एकमेकांना पेढा भरवून, आपल्यात कोणतीही कटुता नाही असं स्पष्ट केलं. तसंच जळगाव जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुकीत आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून एकत्रच काम करत असतो, असंही खडसे आणि महाजन यांनी सांगितलं.

एकनाथ खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन जळगावात गेले होते. त्यावेळी तिघांची ब्रेकफास्ट करत चर्चा झाली. त्यानंतर खडसेंचं समाधान झाल्याचं बोललं जातं.

Khadse Mahajan Teams Rivalry

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *