जयंतराव, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो : एकनाथ खडसे

आज मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाला नसता तर माझ्यावर राजकीय संन्यास घेण्याची वेळ आली असती. | Eknath Khadse

जयंतराव, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो : एकनाथ खडसे


मुंबई: काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विरोधकांना इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना खडसे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. जयंतराव, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो. मी सांगतो कोणी काय केलं? मला कोणालाही जाणीवपूर्वक त्रास द्यायचा नाही. परंतु, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मी याविरोधात आवाज उठवेन, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले. (Eknath Khadse  slams BJP after joining NCP)

आज मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाला नसता तर माझ्यावर राजकीय संन्यास घेण्याची वेळ आली असती. आता मला मार्गदर्शन करायला सांगणारे नेते चार दिवसांपूर्वी भाजपमध्ये आले आहेत. तुम्हाला पहाटे पाच वाजता शपथेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस चांगला वाटला होता. तसाच तो मला आज चांगला वाटतो, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले.

त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, एकनाथ खडसेंचा इशारा
मला एकदा जयंत पाटील यांनी विचारलं की तुम्ही राष्ट्रवादीत येणार का? तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही घेतलं तर येईन. तर त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असे आमचे गमतीत बोलणं सुरु होतं. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, अशी इशारा एकनाथ खडसे यांनी दिला.

“दिल्लीतील वरिष्ठांनीही राष्ट्रवादीत जाण्यास सांगितलं”

100 टक्के पंचायत समिती, नगरपालिका राष्ट्रवादीच्या राहतील. हे चित्र आम्ही दाखवून देऊ. पक्ष सोडावं हे माझ्या मनात नव्हतं, तर ती कार्यकर्त्यांची भावना होती. राष्ट्रवादीत जावं ही देखील कार्यकर्त्यांची भूमिका होती. अनेक पक्षांनी ऑफर दिल्या होत्या.

दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा केली. त्यांना मी विचारलं तर त्यांनीही राष्ट्रवादीत जाण्यास सांगितलं. भाजपमध्ये तुम्हाला भविष्य नाही असंच सांगितलं. भाजपमध्ये अनेकजण आहेत जे तिथं कंटाळले आहेत. पण अनेकांना ईडी मागे लागेल अशी भिती आहे,  असा दावाही एकनाथ खडसेंनी केला.

संबंधित बातम्या:

एकनाथ खडसे यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश, नव्या राजकीय इनिंगला सुरुवात!

जितेंद्र आव्हाडांची समजूत काढण्याचा प्रयत्न, पवारांसोबत तासभर चर्चा, खडसेंच्या प्रवेशासाठी कार्यकर्ते ताटकळत

एकनाथ खडसे यांच्यासह 72 नेते राष्ट्रवादीत, कोणाकोणाचा पक्षप्रवेश?

(Eknath Khadse  slams BJP after joining NCP)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI