AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे सत्तेसाठी अगतिक, लाचार, एकनाथ शिंदेंचा भर सभेत हल्लाबोल!

उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी लाचार, अगतिक झाले आहेत, असं शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरे सत्तेसाठी अगतिक, लाचार, एकनाथ शिंदेंचा भर सभेत हल्लाबोल!
eknath shinde
| Updated on: Jun 19, 2025 | 9:11 PM
Share

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता चांगलीच टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी लाचार झाले. त्यांनी हिंदुत्त्व बाजूला सोडून दिलं. महाराष्ट्रातील जनतेशी प्रतारणा केली. मतदारांना धोका दिला. उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी अगतिक, लाचार झाले, असे एकनाथ शिंदे म्हणाले. आता निवडणुकीचं वारं दिसत असताना त्यांना पुन्हा हिंदुत्त्व, मराठी माणूस आठवत आहे, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला.

2019 साली मराठी माणसांचा विश्वासघात केला

2024 सालच्या निवडणुकीत ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट फक्त 23 टक्के आहे. मतदारांनी ठाकरे गटाला कधीच टाटा-बाय-बाय केलंय. आपल्याकडे आत्मविश्वास आहे. त्यांच्याकडे अहंकार आहे. हा अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला. त्याच काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप कोणी केलं हे आपल्याला माहिती आहे. सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कोणी केलं हेही आपल्याला माहिती आहे. त्यांनी 2019 साली मराठी माणसांचा विश्वासघात केला. महाराष्ट्राचा विश्वासघात केला. सरडाही रंग बदलतो. पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडादेखील महाराष्ट्राने पाहिला. त्यांचेच सगेसोयरे, भाऊबंद हे सांगत आहेत, अशी थेट टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

उलटं टांगून खालून मिरचीची…

मुख्यमंत्रिपदासाठी ते लाचार झाले. ते काय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वारसदार होणार. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्त्वासाठी मतदानाचा अधिकारही गमावला. पण त्यांनी हिंदुत्त्व सोडलं नाही. पण बाळासाहेबांचे आम्ही वारसदार म्हणणाऱ्यांनी सत्तेसाठी लाचारी पत्करली. याला महाराष्ट्र साक्षीदार आहे. बाळासाहेब असते तर खुर्चीसाठी लाचार असणाऱ्या लोकांना त्यांनी उलटं टांगून खालून मिरचीचा धूर दिला असता. हिंदुत्त्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे ते आता उतावीळ, लाचार झाले आहेत, अशी थेट टीकाही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

उद्धव ठाकरेंना विचारले प्रश्न

आम्ही हिंदुत्त्व सोडलं नाही, असं ते म्हणतात. मग बालासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयस्रमाट म्हणताना तुमची जीभ का कचरते. हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्यांच्या, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता? असे अनेक प्रश्नही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी