AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे समर्थक नरेश म्हस्के यांचा मोठा निर्णय, दुपारी शक्तिप्रदर्शन, रात्री ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

नरेश म्हस्के यांनी शिंदे यांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना इशारा दिला. तसंच काँग्रेस, राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. त्यानंतर रात्री त्यांनी ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे समर्थक नरेश म्हस्के यांचा मोठा निर्णय, दुपारी शक्तिप्रदर्शन, रात्री ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा
| Updated on: Jun 25, 2022 | 11:25 PM
Share

ठाणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे समर्थक आणि ठाणे महापालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी मोठा निर्णय घेतलाय. दुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. त्यावेळी नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी शिंदे यांच्या उल्हासनगरमधील कार्यालयावर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना इशारा दिला. तसंच काँग्रेस, राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. त्यानंतर रात्री त्यांनी ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला. नरेश म्हस्के यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र पाठवलं आहे. त्यात गेले अडीच वर्षे आपल्या संघटनेची ‘राष्ट्रवादी’ गळचेपी चाललीय. त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचं नरेश म्हस्के यांनी म्हटलंय.

उल्हासनगरमध्ये एकनाथ शिंदे यांचं कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी रस्त्यावर उतरुन शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी त्यांच्यासोबत ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के हे सुद्धा होते. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शिंदे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, शिवसेना जिंदाबाद, अशा घोषणा यावेळी देण्यात आले. नरेश म्हस्के यांनीही आपण शिंदेसाहेब यांच्यासोबत असल्याचं यावेळी जाहीर केलं.

‘आयुष्यभर राष्ट्रवादी आणि काँग्रेसविरोधात लढलो, पुढेही लढत राहू’

आम्ही शिवसेनेसोबतच आहोत. ठाणे महानगरपालिकेचा काम करत असताना अनेक त्रास झाला. अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. अनेक आरोप करण्यात आले. आपण महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र असतानाही ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी खूप त्रास दिला. ज्यावेळी ऑक्सिजनचा प्रश्न होता, तेव्हा ठाणे महापालिकेत ऑक्सिजन आपण निर्माण केला. परंतू महापालिकेला बदनाम करण्यासाठी महासभे दिवशी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आंदोलन केलं. कशासाठी? महाविकास आघाडीत असताना तुम्ही आम्हाला साथ दिली पाहिजे तिथे तुम्ही आमच्याविरोधात आंदोलन करत होता. मग कसली आलीय आघाडी? मग आम्ही ठरवलं आयुष्यभर आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसविरोधात लढलो, पुढेही आम्ही त्यांच्याविरोधात लढत राहू.

आमच्या नादी लागाल तर भारी पडेल – नरेश म्हस्के

आताही आमदार सांगत आहेत की आम्ही शिवसेनेतच आहोत, फक्त राष्ट्रवादी, काँग्रेससोबत आघाडी तोडा. म्हणून ठाण्यातील शिवसैनिक शिंदेसाहेबांच्या सोबत आहे आणि शेवटपर्यंत राहणात. ठाण्यात कुणाची माय व्यायली नाही. पण काही बातम्या आल्या की शिंदे साहेबांच्या बॅनरला काळं फासण्याचा प्रयत्न झाला. त्यांना मला सांगायचं आहे की आमच्या नादी लागाल तर भारी पडेल. आतापर्यंत आम्ही संयम राखलाय. आज ठाण्यात कुठल्याही पद्धतीत कुणाच्याही विरोधात कुठलंही वक्तव्य केलं नाही. आम्ही दिघे साहेबांच्या संस्कृतीत वाढलो आहोत. आजही आम्ही शिवसेनेत आहोत.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.