मोठी बातमी! एक उमेदवार एकाच जागेवरुन निवडणूक लढू शकणार, एक्झिट पोल्सवरही बंदी?

अनेक उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात एकापेक्षा जास्त जागेवरुन निवडणूक लढवत असल्याचं अनेकदा पाहण्यात आलेलं आहे.

मोठी बातमी! एक उमेदवार एकाच जागेवरुन निवडणूक लढू शकणार, एक्झिट पोल्सवरही बंदी?
केंद्रीय निवडणुक आयोग
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 6:53 AM

मुंबई : एकावेळी एकापेक्षा जास्त जागावरुन निवडणूक (Election candidates) लढवणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. एकावेळी दोन-दोन जागांवर निवडणूक (Election Commission) लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोग मोठा धक्का देण्याच्या तयारी असून येत्या काळात एक उमेदवार एकच जागा लढवू शकतो. त्याला दुसर्या जागी निवडणूक लढवू देण्यास मुभा देऊ नये. तसंच एक्सिझ पोल्ससह जनमत चाचण्यांवर बंदी आणवी, अशी भूमिका निवडणूक आयोगानं घेतली आहे. त्या संबंधी मागमी करणारा प्रस्ताव मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केंद्र सरकारकडे (Centre government) पाठवलाय. निवडणुकीशी संबंधित महत्त्वाचे बदल केले जावेत या दृष्टीनं मुख्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पावलं टाकली आहे. निवडणूक आयोगाने पाठलेला हा प्रस्ताव जर मान्य झाला, तर 1951च्या कलम 37(1) मध्ये मोठा बदल होणार आहे.

अनेक उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात एकापेक्षा जास्त जागेवरुन निवडणूक लढवत असल्याचं अनेकदा पाहण्यात आलेलं आहे. याला मुख्य निवडणूक आयोगानं विरोध केल्याचं प्रस्तावातून दिसतंय. तसंच एक्झिट पोल्सची चर्चा निवडणूक निकालाची आधी तुफान असायची. या एक्झिट पोल्सवरही बंद येण्याची शक्यता वर्तवली जातेय.

निवडणूक आयोगाने केलेल्या प्रमुख 6 मागण्या कोणत्या?

  1. वोटिंग कार्ड आधारशी लिंक केलं जावं
  2. नव्या मतदारांची नोंदणी करण्यासाठी चार कटऑफ तारखंचा नियम जारी करावा
  3. हे सुद्धा वाचा
  4. एका उमेदराला एकापेक्षा जास्त जागेवरुन निवडणूक लढवू देऊ नये, त्यासाठी लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 33(7) मध्ये दुरुस्तीस मंजुरी द्यावी
  5. राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला द्यावेत
  6. एक्झिट पोल्स आणि जनमत चाचण्यांवर बंदी असावी
  7. निवडणूक अधिसूचनेच्या दिवसापासून जोपर्यंत निवडणूक पूर्ण होत नाही, तोपर्यंत जनमत चाचण्याचं निकाल जाहीर करण्यावर बंदी घालावी

पाहा व्हिडीओ :

एकूण 6 प्रमुख मागण्या मुख्य निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी केलेले असून केंद्र सरकार या प्रस्तावावर नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं आता महत्त्वाचंय.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.