राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच… माजी आमदार राजीव आवळे अजित पवारांच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश

माजी आमदार राजीव आवळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच... माजी आमदार राजीव आवळे अजित पवारांच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 8:55 PM

इचलकरंजी :  राष्ट्रवादीचे अच्छे दिन यायला सुरुवात झाली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु आहे आणि यात आता मोठं नाव जोडलं गेलं आहे ते म्हणजे माजी आमदार राजीव आवळे यांचं… राजीव आवळे लवकरच राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेणार आहेत. (EX MLA Rajiv Awle Will Join NCp)

“इचलकरंजी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनतेच्या प्रश्‍नांची जाण असणारा आणि सामान्य जनतेशी नाळ जोडला गेलेला असल्यामुळेच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आपण मुंबई येथे कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश करणार” असल्याची माहिती माजी आमदार राजीव आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अशोकराव जांभळे आणि मदन कारंडे यांना एकत्र आणून पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही आवळे यांनी सांगितले.

“शरद पवार यांनी सतत दलित-बहुजन समाजाचे प्रश्‍न सोडून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासह कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचे काम केले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्त्वाखाली समाजाचे प्रश्‍न सोडवून पक्ष वाढविण्याचे काम करुन पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारुन वाटचाल करणार” असल्याचं आवळे यांनी सांगितलं.

वडगांव मतदारसंघातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पाठीशी आहेत. जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून आपण सातत्याने कार्यरत होतो. परंतु मर्यादीत क्षेत्र आणि कामावर येणार्‍या मर्यादा यामुळे संधी असूनही काम करता आले नाही. शिवाय मागील विधानसभा निवडणुकीत निष्ठेला डावलून धनिकांना उमेदवारी देण्यात आल्याची खंत यावेळी आवळेंनी बोलून दाखवली.

“गेली 20 वर्षे हातकणंगले तालुक्यात कार्यकर्त्यांचा संपर्क आणि सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विधानसभेवर आमदार म्हणून जाण्याची संधी मिळाली. त्यातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. सत्तेशिवाय लोकांचा संपर्क आणि लोकांची कामे करण्याची आपली धडपड पाहून राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे व राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा प्रविता सालपे आणि हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असून सर्वांच्या सहकार्याने पक्षाला बळकटी देण्यासाठी निश्‍चितपणे प्रयत्नशील राहू”, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

राष्ट्रवादी प्रवेशासाठी नगरचे अनेक नेते इच्छुक, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या दाव्याने खळबळ

ओहोटी संपली आता भरती येणार, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर रोहित पवारांचे सूचक ट्विट

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.