काँग्रेसकडून ‘शेतकरी विजय दिवस’ राज्यभर साजरा; पंतप्रधानांनी देशातील जनतेचा विश्वास गमावला, नसीम खान यांची टीका

हा शेतकऱ्यांच्या त्यागाचा, बलिदानाचा, त्यांनी वर्षभर केलेल्या संघर्षाचा विजय आहे. पंतप्रधानांनी कृषी कायदे मागे घेत असल्याचे जाहीर करुनही जोपर्यंत संसदेत निर्णय होत नाही, तोपर्यंत शेतकरी त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही. हा पंतप्रधानांनी शेतकरी व जनतेचा विश्वास गमावल्याचे द्योतक आहे, असे माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी म्हटले आहे.

काँग्रेसकडून ‘शेतकरी विजय दिवस’ राज्यभर साजरा; पंतप्रधानांनी देशातील जनतेचा विश्वास गमावला, नसीम खान यांची टीका
काँग्रेसकडून शेतकरी विजय दिवस साजरा
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 4:37 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा शुक्रवारी केली. त्यानंतर विरोधक आणि अनेक शेतकरी संघटनांकडून आनदोत्सव साजरा केला जातोय. काँग्रेसकडूनही आज राज्यात ‘शेतकरी विजय दिवस’ साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे तीन काळे कृषी कायदे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले. हा शेतकऱ्यांच्या त्यागाचा, बलिदानाचा, त्यांनी वर्षभर केलेल्या संघर्षाचा विजय आहे. पंतप्रधानांनी कृषी कायदे मागे घेत असल्याचे जाहीर करुनही जोपर्यंत संसदेत निर्णय होत नाही, तोपर्यंत शेतकरी त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही. हा पंतप्रधानांनी शेतकरी व जनतेचा विश्वास गमावल्याचे द्योतक आहे, असे माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी म्हटले आहे. (Congress celebrates Farmers Victory Day in Maharashtra, Naseem Khan criticizes PM Modi)

केंद्र सरकारने तीन काळे कृषी कायदे मागे घेतल्यानंतर प्रदेश काँग्रेसने आज राज्यभर ‘किसान विजय दिवस’ साजरा केला. मुंबईत टिळक भवन येथे फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, मुनाफ हकीम, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, राजेश शर्मा, प्रमोद मोरे, रमेश शेट्टी, सचिव राजाराम देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

‘राहुल गांधी यांचं ऐकलं असतं तर शेतकऱ्यांचा नाहक बळी गेला नसता’

यावेळी नसीम खान म्हणाले की, या आंदोलनात काँग्रेस पक्ष पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. खासदार राहुल गांधी यांनी रस्त्यावर उतरुनही या संघर्षात सहभाग घेतला. पहिल्या दिवसापासून राहुल गांधी यांनी, हे कायदे सरकारला मागे घ्यावे लागतील अशी परखड भूमिका मांडली होती आणि मोदी सरकारला अखेर हे जुलमी कायदे मागे घ्यावेच लागले. राहुल गांधी यांचे आधीच ऐकले असते तर 700 शेतकऱ्यांचा नाहक बळी गेला नसता व आर्थिक नुकसानही झाले नसते. महाराष्ट्रातही शेतकरी आंदोलनात काँग्रेस पक्षाने भक्कम साथ दिली. हे काळे कायदे रद्द करावेत यासाठी शेतकरी मेळावे, ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. राज्यातून 60 लाख सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले.

‘भाजपाचा अहंकार, मनमानीपणा देशातील जनतेच्या मुळावर उठला’

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नक्षलवादी, देशद्रोही, खलिस्तानी, आंदोलनजीवी म्हणून अपमानित करण्यात आले. त्यांच्यावर अत्याचार केले गेले, दिल्लीत येऊ नये म्हणून रस्त्यावर मोठे खिळे ठोकले, भिंती उभ्या केल्या पण शेवटी शेतकरी एकजुटीपुढे केंद्र सरकारला झुकावे लागले. शेतकऱ्यांचा केलेला अपमान जनता कधीही विसरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय देशाला खड्यात घालणारा निघाला. नोटबंदी, कोरोना व काळे कृषी कायदे हे घातक ठरतील हे राहुल गांधी यांनी जाहीरपणे सांगितले होते. पण त्याकडे लक्ष देण्याऐवजी त्यांची खिल्ली उडवण्यात आली. भाजपाचा हा अहंकार, मनमानीपणा हा देशातील जनतेच्या मुळावर उठला असून त्यात नुकसान जनतेचे होत आहे, असंही नसीम खान म्हणाले.

पुणे येथे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, रमेश बागवे, उल्हास पवार यांनी सहभाग घेतला. नाशिक, सोलापूर, नागपूर, अमरावती, पनवेल, परभणी, लातूर, नांदेडसह राज्यातील सर्व जिल्हा, तालुक्यातही काँग्रेस पदाधिकारी यांनी जल्लोष करुव किसान विजय दिवस साजरा केला.

इतर बातम्या :

Video : ‘आधी जोरदार टीका, मग एकाच सोफ्यावर मनमोकळ्या गप्पा’, नाशिकच्या लग्न सोहळ्यातील खास राजकीय चित्र

‘ते निम्मे डॉक्टर, त्यांनी माझी मानसिकता तपासावी, मी त्यांचं डोकं तपासतो’, चंदक्रांत पाटलांचा राऊतांवर पलटवार

Congress celebrates Farmers Victory Day in Maharashtra, Naseem Khan criticizes PM Modi

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.