दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालावी, अंकुश काकडेंची अजित पवारांकडे मागणी

दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालावी," अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे. (Firecrackers should be ban in this Diwali due to Corona Infection Ankush Kakade demand)

दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालावी, अंकुश काकडेंची अजित पवारांकडे मागणी

पुणे : “राज्यात कोरोनाचा संसर्ग अजून कमी झालेला नाही. त्यात आता दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढू शकतो. त्यामुळे दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालावी,” अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहित त्यांनी ही मागणी केली आहे. (Firecrackers should be ban in this Diwali due to Corona Infection Ankush Kakade demand)

“कोरोनाचे संकट अजून दूर झालेले नाही. ज्यांना श्वसनाचे विकार आहेत, अशा लोकांना कोरोनाचा संसर्ग गंभीर होतो. दिवाळीमध्ये फटाक्यांच्या धुरामुळे अनेकांना श्वसनाचे विकार होतात, असे अनेक अहवाल प्रसिद्ध झाले आहेत.”

“विशेषत: शोभेच्या दारुमुळे वायू प्रदूषण, धूर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अगोदरच काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी या दिवाळीत कुठलेही फटाके, शोभेची दारु उडविण्यात बंदी करावी,” असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी पत्रात लिहिलं आहे.

त्यामुळे येत्या दिवाळीत फटाक्यांसोबतच शोभेच्या दारूमुळे वायू प्रदूषण होते. त्यामुळे शोभेची दारू उडवण्यास बंदी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्या या मागणीवर अजित पवार नेमकं काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्तवाचं ठरणार आहे. (Firecrackers should be ban in this Diwali due to Corona Infection Ankush Kakade demand)

संबंधित बातम्या : 

Mumbai Corona | मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला

वेग मंदावला! राज्यात 5,984 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तब्बल 15 हजार रुग्ण बरे होऊन घरी

Published On - 12:47 pm, Tue, 20 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI