बंडखोरांचा फटका बसणार का? ‘संकटमोचक’ गिरीश महाजनांचं उत्तर

उमेदवारांचे मताधिक्य कमी होईल, परंतु उमेदवार महायुतीचाच निवडून येईल, असा विश्वास गिरीश महाजन यांना वाटतो

बंडखोरांचा फटका बसणार का? 'संकटमोचक' गिरीश महाजनांचं उत्तर

जळगाव : जळगावात महायुतीचे सर्वच उमेदवार मतमोजणीत आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. विजयाच्या दिशेने महायुतीच्या उमेदवारांची घोडदौड चालली आहे. बंडखोरांमुळे उमेदवारांचं मताधिक्य कमी होईल, परंतु आम्ही निश्चित 220 चा आकडा पार करु, अशी स्थिती राज्यात दिसत आहे, असा विश्वास भाजपचे ‘संकटमोचक’ नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी (Girish Mahajan BJP Vidhansabha Result) ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

बंडखोरी केलेल्या उमेदवारांचा काहीच परिणाम या निवडणुकीत दिसून येत नाही. उमेदवारांचे मताधिक्य कमी होईल, परंतु उमेदवार महायुतीचाच निवडून येईल. ज्याप्रमाणे भाजपचे बंडखोर होते त्याचप्रमाणे शिवसेनेचेही बंडखोर होते. परंतु निवडून मात्र आमचा महायुतीचा उमेदवार येईल, असं गिरीश महाजन म्हणाले.

बंडखोरांवर होणाऱ्या कारवाई संदर्भात बोलताना महाजन म्हणाले की, बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. काहींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर काहींची पक्षातून हकालपट्टी देखील करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, जो भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे तोच आमचा अधिकृत उमेदवार आहे, असं महाजन यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पहिला निकाल जाहीर

एक्झिट पोल बाबत बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, जरी आमच्या जागा एक्झिट पोल मध्ये 126 च्या आसपास दाखवल्या असल्या तरी मला विश्वास आहे की जवळपास 130 ते 135 पर्यंत आमच्या जागा निवडून येतील आणि मी स्वतः जामनेर मध्ये 40 हजारच्या मताधिक्याने निवडून येईल असं यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले.

शिवसेनेचे मुक्ताईनगर येथील बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेने काहीही कारवाई केली नाही असा आरोप खडसे यांनी केला यावर बोलताना महाजन म्हणाले की, मुक्ताईनगरची जागा ही आमची आहे आणि आम्हीच निवडून येऊ त्यामुळे बंडखोरांवर कारवाई झाली की नाही त्याला नोटीस दिली की नाही हा विषय गौण आहे, असंही महाजन म्हणतात. Girish Mahajan BJP Vidhansabha Result

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI