‘अंधेर नगरी चौपट राजा’ अशी सरकारची परिस्थिती : गिरीश महाजन

'अंधेर नगरी चौपट राजा' अशी सरकारची परिस्थिती : गिरीश महाजन

शेतकऱ्यांबद्दल बोलून, त्यांच्याबद्दल कळवळा दाखवून काहीही होणार नाही, असेही गिरीश महाजन यावेळी (Girish Mahajan criticizes Thackeray Government) म्हणाले.

Namrata Patil

|

Mar 08, 2020 | 9:34 AM

जळगाव : “राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. पण सरकारमध्ये कुठेच ताळमेळ (Girish Mahajan criticizes Thackeray Government)  नाही. मला कोणावरही वैयक्तिक टीका-टिप्पणी करायची नाही, पण अंधेर नगरी चौपट राजा अशी परिस्थिती आज या सरकारची झाली आहे,” अशी टीका भाजप नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली. जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे कृतज्ञता सत्कार सोहळा समारंभातील दरम्यान त्यांनी ही टीका केली.

“मला वाटतं अजून सुरुवात (Girish Mahajan criticizes Thackeray Government) आहे. अजून आम्हाला काय काय भोगावं लागेल. कारण यांच्यात कुठेच काही ताळमेळ नाही. सरकारमध्ये कुठेच काही ताळमेळ नाही. तीन पक्षांचं सरकार आहे. कोणाचं कुणाला काहीही माहिती नाही. मला कोणाबाबतही वैयक्तिक टीका टिप्पणी करायची नाही. पण अंधेर नगरी चौपट राजा अशी परिस्थिती या सरकारची झाली आहे,” अशी टीका महाजन यांनी केली.

गणेश नाईकांना कोरोना व्हायरसचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर करा : जितेंद्र आव्हाड

“अजून सुरुवात आहे. पुढील दोन-चार दिवसात बघा काय काय चित्र बघायला मिळेल. शेतकऱ्यांबद्दल बोलून, त्यांच्याबद्दल कळवळा दाखवून काहीही होणार नाही. त्यांना मदत केली पाहिजे. त्यांना वीज दिली पाहिजे, पाणी आहे पण वीज नसेल तर आम्हाला काय करायच?” असा प्रश्नही गिरीश महाजनांनी उपस्थितीत केला.

गिरीश महाजनांचा भव्य सत्कार

भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात गिरीश महाजन यांनी 65 कोटीचा भरघोस निधी वरणगावच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला होता. त्या अनुषंगाने धरणगावातील विविध विकास कामांचे लोकार्पण करून गिरीश महाजन यांचा भव्य कृतज्ञता सत्कार करण्यात आला.

महाविकासआघाडी सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत गिरीश महाजन यांनी टीका केली. “सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला आहे, त्यात उत्तर महाराष्ट्रात साधं नाव सुद्धा नाही. कुठला निधी नाही. अपूर्ण योजना कशा पूर्ण करायच्या हा प्रश्न सध्या आमच्यासमोर आहे. सरकार फक्त पश्चिम महाराष्ट्र पुरतं मर्यादित आहे की काय? असेल तर उर्वरित महाराष्ट्राचं होणार काय? अर्थसंकल्प करत असताना तो सर्वसमावेशक असला पाहिजे,” असे गिरीश महाजन म्हणाले.

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होईल? अमृता फडणवीस म्हणतात…

“आमच्या काळात आम्ही सर्वांना न्याय दिला. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व रखडलेली कामे आम्ही पूर्ण केली. पण सरकार बदललं त्यामुळे सर्व चित्र बदलले. शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करून अशा घोषणा झाल्या. पण कुठे काय? शेतकऱ्यांना अनेक महिने ट्रान्सफॉर्मर मिळत नाही. मग तो शेतकरी जगेल की मरेल? विहिरीत, धरणात, नद्यांमध्ये पाणी आहे. पण वीजच नाही. मग शेतकऱ्यांनी करायचं तरी काय?” असा प्रश्नही महाजनांनी उपस्थित केला.

“लोकहिताच्या कामाला विद्यमान सरकारने कुठेही स्थगिती देऊ नये. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करु. पण लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवतो, अशा ठिकाणी या गोष्टी होता कामा नये.” असेही गिरीश महाजन यावेळी (Girish Mahajan criticizes Thackeray Government) म्हणाले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें