गिरीश महाजनांनी वायफायने ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप

मुंबई: राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याविरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार करण्यात आली आहे. वायफायद्वारे ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ही तक्रार दुसरी तिसरी कोणी नाही तर खुद्द भाजप आमदार अनिल गोटे यांनीच केली आहे.  याबाबत अनिल गोटे यांनी पोलिस महासंचालकांना पत्र लिहून गिरीश महाजन आणि जयकुमार …

गिरीश महाजनांनी वायफायने ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप

मुंबई: राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याविरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार करण्यात आली आहे. वायफायद्वारे ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ही तक्रार दुसरी तिसरी कोणी नाही तर खुद्द भाजप आमदार अनिल गोटे यांनीच केली आहे.  याबाबत अनिल गोटे यांनी पोलिस महासंचालकांना पत्र लिहून गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांच्याविरोधात तक्रार केली आहे. धुळे महानगरपालिका निवडणुकीत हा प्रकार घडल्याचा आरोप आमदार अनिल गोटे यांनी केला.

वाचा: EVM हॅकिंगच्या माहितीमुळेच गोपीनाथ मुंडेंची हत्या, अमेरिकन एक्स्पर्टचा दावा

यापूर्वी अनिल गोटे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने महापालिका निवडणूक मॅनेज केल्याचा आरोप भाजप आमदार अनिल  गोटे यांनी केला होता.

“गिरीश महाजन यांनी सगळ्या निवडणुका मॅनेज केल्या. ज्या ज्या ठिकाणी यांच्याकडे जबाबदारी होती, त्या त्या ठिकाणी यांनी पैसा आणि मशिन मॅनेज केल्या. गिरीश महाजन मॅनेज केल्याशिवाय कुठलीही निवडणूक जिंकू शकत नाहीत. महाजनांच्या या सगळ्या कारस्थानाला मुख्यमंत्र्यांची मदत केली. मुख्यमंत्री या सगळ्यात तेवढेच सामील आहेत.”, असं अनिल गोटे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

वाचा: फडणवीस-महाजनांवर भाजप आमदार अनिल गोटेंचे सनसनाटी आरोप  

धुळ्यात पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपविरोधात बंड पुकारणाऱ्या आमदार अनिल गोटेंच्या लोकसंग्राम पक्षाचा केवळ एकच उमेदवार निवडून आला होता. भाजपने 50 जागांवर आघाडी घेत धुळे महापालिकेत बहुमत मिळवलं. भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्या त्यांच्याच पक्षाला दिलेल्या आव्हानामुळे ही निवडणूक चर्चेचा विषय बनली होती.

अनिल गोटे यांच्या पक्षाचा धुळ्यात फार प्रभाव दिसून आला नाही. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही सपाटून मार खाल्ला.

संबंधित बातम्या 

फडणवीस-महाजनांवर भाजप आमदार अनिल गोटेंचे सनसनाटी आरोप  

धुळ्यात अनिल गोटेंच्या पत्नीचा विजय, मुलाचा पराभव  

धुळे महापालिकेवर अखेर भाजपचा झेंडा, अनिल गोटेंच्या पक्षाचा सुपडासाफ 

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *